Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रीलिजआधीच मराठी सिनेमाने कमावला कोट्यवधींचा गल्ला, बॉक्स ऑफिसवर ‘गुलाबी’ची हवा; किती झाली कमाई?

4

Marathi Movie Gulabi Advance Booking: बॉलिवूड किंवा दाक्षिणात्य सिनेमांची रीलिजआधीच आगाऊ बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई झाल्याचे आपण अनेकदा वाचतो. मराठी सिनेमानेही अलीकडेच रीलिजआधी कोट्यवधींची कमाई केली आहे.

हायलाइट्स:

  • ‘गुलाबी’ सिनेमाची कोट्यवधींची कमाई
  • रीलिजपूर्वीच कमावला मोठा गल्ला
  • २२ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली. आता या यादीमध्ये आणखी एक मराठी सिनेमा जोडला जाऊ शकतो, कारण या फिल्मने रीलिजपूर्वीच कोट्यवधीचा आकडा पार केला आहे. २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नाव ‘गुलाबी’ असे असून या सिनेमाने प्रदर्शानपूर्वीच एवढी मोठी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

रीलिजआधीच मराठी चित्रपटाने कमावला १ कोटी रुपयांचा गल्ला

‘गुलाबी’च्या स्टारकास्टमुळे या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अभिनेत्री श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावे या तीन आघाडीच्या अभिनेत्रींची ‘गुलाबी’मध्ये मुख्य भूमिका आहे. बुकिंग सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी तिकिचे बुक केली आहेत. लेटेस्ट अपडेटनुसार या चित्रपटाचे प्री-बुकिंग एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ‘गुलाबीने घडविला इतिहास’, असे म्हणत या सिनेमाच्या टीमने याविषयीची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी असा दावा केला आहे की, रीलिजआधी १ कोटींची कमाई करणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

‘गुलाबी’चे दिग्दर्शन अभ्यंग कुवळेकरने केले असून त्याने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘पूर्वप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. प्रेक्षकांचा हा पाठिंबा “गुलाबी” चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत. “गुलाबी” चित्रपटात मैत्री आणि स्वप्नांचा एक सुंदर प्रवास दाखवला आहे. लोकांच्या हृदयात “गुलाबी”ने आधीच स्थान मिळवले आहे याचा खूप आनंद होतो. प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल याची खात्री आहे.’

‘शालीचे धागे निघालेत, पण विंगेत उभं राहिल्यावर…’ नाटकाच्या ५५० प्रयोगांसाठी अभिनेत्याने वापरली एकच शाल
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत, अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाची निर्मिती सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी केली आहे. मृणाल, अश्विनी आणि श्रुतीसह सिनेमात कलाकारांची फौज पाहायला मिळेल. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अभिनेता शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अमोल भगत या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.