Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘सिंघम अगेन’ डबघाईला; १३ दिवसांतही कमाई करण्यास अयशस्वी, अजय देवगणचा सिनेमा ठरणार का फ्लॉप?

5

Singham Again Box Office Collection : ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे. हा बिग बजेट चित्रपट रिलीज होऊन १३ दिवस उलटूनही २५० कोटींचा आकडा पार करू शकला नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्सचा दिवाळी रिलीज ‘सिंघम अगेन’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाकडून प्रेक्षकांची खूप अपेक्षा होती आणि या सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असं वाटत होतं. ओपनिंग वीकेंडपर्यंत या चित्रपटाने दमदार कलेक्शन केलं पण नंतर पहिल्या आठवड्यातच ‘सिंघम अगेन’चं नशीब डळमळीत झाल्याचं दिसलं. दुसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटाची स्थिती बिघडली असून केवळ काही कोटींची कमाई करू शकला आहे.

‘सिंघम अगेन’ने १३व्या दिवशी किती कमाई केली?

‘सिंघम अगेन’ मध्ये जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्सही आहेत. अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर यांसारख्या दिग्गज स्टार्सची फौज आणि चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खानचाही कॅमिओ आहे. मात्र, सर्व सुपरस्टार कलाकार असले तरी या सिनेमाची जादू थिएटरवर जास्त चालली नाही. पहिल्या आठवड्यापासून हा चित्रपट कमाईसाठी आसुसलेला दिसतोय आणि आता तो फ्लॉप होणार हे निश्चित दिसतय.

‘सिंघम अगेन’ डबघाईला; १३ दिवसांतही कमाई करण्यास अयशस्वी, अजय देवगणचा सिनेमा ठरणार का फ्लॉप?

सिंघम अगेनच्या कमाईबद्दल सांगायचं झाल्यास, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात १७३ कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी ‘सिंघम अगेन’ने ८ कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी १२ कोटी २५ लाख रुपये, दुसऱ्या रविवारी ४ कोटी २५ लाख रुपये आणि दुसऱ्या मंगळवारी ३ कोटी ५ लाख रुपयांची कमाई केली.

Sacknilk रिपोर्टनुसार, ‘सिंघम अगेन’ ने रिलीजच्या १३व्या दिवशी ३ कोटी १५ लाख रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच ‘सिंघम अगेन’ची १३ दिवसांची एकूण कमाई आता २१७ कोटी ६५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. ‘सिंघम अगेन’ दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला असून काही कोटींची कमाई करण्यासाठी हा चित्रपट खूप धडपडत आहे. रिलीजच्या १३ दिवसांनंतरही या सिनेमाने २५० कोटींचा पल्ला गाठलेला नाहीये. अशा परिस्थितीत ‘सिंघम अगेन’ आता फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.

बाप इंडस्ट्रीचा सुपरस्टार पण लेकीला झाला डोक्याला ताप; वैतागून अभिनेत्रीने बदललं नाव
दरम्यान, सूर्या आणि बॉबी देओलचा बहुप्रतिक्षित कांगुवा हा चित्रपट १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं प्री बुकिंग सुरू झालं असल्यामुळे त्याचा परिणाम ‘सिंघम अगेन’ वर झालेला दिसतोय.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.