Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sarva Pitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्येला करा हे उपाय ! दूर होतील समस्या, पूर्वज देतील आशीर्वाद!

18

Sarva Pitri Amavasya 2024 Upay: पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहित त्यांचे श्राद्ध आणि तर्पण यादिवशी केले जाते. तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास तोटके केले जातात असे सांगितले जाते. हे उपाय किंवा तोटके केले तर पितृदोषातून मुक्ती मिळते असे म्हणतात. काय आहेत ते उपाय जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Sarva Pitri Amavasya 2024 Totke :

हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी होणार असून २ ऑक्टोबर रात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात. चला तर जाणून घेवूया कोणते उपाय सर्वपित्री अमवास्येच्या दिवशी करतात.

जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सातवेळा तुमच्यावरून उतरून टाका. त्या लिंबाचे ४ तुकडे करून चारी दिशांना फेकून द्या. यामुळे करिअरमध्ये शुभलाभ होईल.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घरातीव ईशान्य कोनात गायीच्या तुपाचा दिवा लावा. यासाटी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा. दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल.

सर्वपित्री अमावस्येला रात्री काळी कुत्र्याला तुप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला. जर कुत्र्याने त्वरीत पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधत तुमच्याविरुद्ध काहीही करु शकणार नाहीत. तसेच या दिवशी तामसि भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये, यामुळे पूर्वज नाराज होतात.

सर्वपित्री अमावस्येला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलीत दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तची उन्नती होते.

सर्वपित्री अमावस्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते. सकाळी स्नान आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीच्या नाग नागिणीची पूजा करावी. त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहीत करून द्यावे. यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी बाभूळच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे. त्याचबरोबर कच्चे दूध, दोन लवंग, थोडे बतासे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावेत. यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात.
असे म्हणतात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तिळ आणि फुले अर्पण करा. ऊँ पितृभ्य नम: मंत्राचा जाप करून ११ प्रदक्षिणा घाला. त्यानंतर पितृसुक्ताचे पठण करा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलीत करून काळे तीळ अर्पण करा. यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील.

सर्वपित्री अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खावू घालावे. मुंग्यांना गोड पीठ किंवा माश्यांना पिठाचे गोळे खायला द्यावेत. हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.