Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 1 ऑक्टोबर 2024: चंद्र गुरु नवम पंचम योग, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

14

मंगळवार १ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ९ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण चतुर्दशी रात्री ९-३८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी सकाळी ९-१५ पर्यंत, चंद्रराशी: सिंह सायं. ४-०१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: हस्त

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति शक संवत १९४६, भाद्रपद कृष्ण चतुर्दशी, मंगळवार, विक्रम संवत २०८१, रब्बी उल्लावल २७, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १ ऑक्टोबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी रात्री ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ

पूर्वा फाल्गनी नक्षत्र सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, शुक्ल योग मध्यरात्री २ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३०
  • सूर्यास्त: सायं. ६-२६
  • चंद्रोदय: पहाटे ५-१२
  • चंद्रास्त: सायं. ५-४३

  • पूर्ण भरती: सकाळी ११-२० पाण्याची उंची ४.०४ मीटर, रात्री ११-३७ पाण्याची उंची ३.९३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५३ पाण्याची उंची १.२३ मीटर, सायं. ५-२० पाण्याची उंची १.०९ मीटर
  • सण आणि व्रत: चंद्र गुरु नवम पंचम योग, चतुर्दशी श्राद्ध तिथी, शस्त्रदिहत् पितृ श्राद्ध

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३७ मिनिटांपासून ते ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ९ मिनिटांपासून ते २ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांपासून ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून ते ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
संकटमोचन हनुमानाष्टकाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.