Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 1 ऑक्टोबर 2024: कन्या राशीची विनाकारण धावपळ, रागावर नियंत्रण हवे ! कुंभ राशीला नवे प्रोजेक्ट मिळणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य

12

Finance Horoscope Today 1 October 2024 In Marathi : 1 ऑक्टोबर रोजी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून प्रत्येका कामात नशिबाची उत्तम साथ असेल. वृषभ राशीला कामात यश आहे पण पाहुण्यांमुळे खर्चात वाढ होईल. कर्क राशीच्या लोकांनी नोकरी बदलण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. कन्या राशीची विनाकारण धावपळ असून रागावर नियंत्रण हवे. वृश्चिक राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळणार आहे तसेच कामात नशिबाची साथ आहे. धनु राशीच्या लोकांनी आज दिवस करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे.मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभ होईल आणि तुमचे जीवन आनंददायी राहील. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया 1 ऑक्टोबरचे आर्थिक आणि करिअर राशीभविष्य.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 1 ऑक्टोबर 2024: कन्या राशीची विनाकारण धावपळ, रागावर नियंत्रण हवे ! कुंभ राशीला नवे प्रोजेक्ट मिळणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Aaj che Aarthik Rashi Bhavishya 1 October 2024 : 1 ऑक्टोबर मंगळवार, हा दिवस मेष, वृषभसह या राशींसाठी दिवस उत्तम आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून काही बाबतीत तुमची धावपळ होईल पण तुमच्यासाठी शुभलाभाचा दिवस आहे.तुम्हाला व्यवसायात यश मिळणार असून संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात पुढे जाण्याची हीच वेळ आलेली आहे. या राशीच्या लोकांना कामात अडचण आहे तेव्हा सावध राहा. करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : आर्थिक समस्या दूर, धावपळ करावी लागेल

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून प्रत्येका कामात नशिबाची उत्तम साथ असेल. आर्थिक समस्या दूर होईल. पार्टटाइम कामासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल त्याचा लाभ घ्या. तुम्ही तुमच्या चांगल्या वर्तणुकीतून वातावरण चांगले बनवाल. बायकोच्या तब्येतीमुळे तुम्हाला आज धावपळ करावी लागेल, तुम्हाला आज काही त्रासाला तोंड द्यावे लागू शकते. प्रवासाचा योग आहे त्याचा लाभ घ्या.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : कामात यश, पाहुण्यांमुळे खर्चात वाढ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला सफलता मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला दुपारपर्यंत आनंदाची बातमी मिळेल. प्रकृतीबद्दल सावध पाहा, तरच तुम्हाला लाभ मिळतील. सायंकाळपर्यंत बहुप्रतीक्षित नातेवाईकांचे आगमन झाल्याने आनंद होईल पण त्याचबरोबर खर्चात थोडी वाढ होईल. रात्री तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमचे मन प्रसन्न होईल.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : वेळेचा लाभ घ्या, कामात यश

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. वेळ खूप गतीने पुढे जातो आहे त्याचा लाभ घ्या. वेळेला वाया जावू देवू नका. ऑफिसमध्ये तुम्हाला यश मिळेल पण तुमचे कौतुक पाहून सहकारी तुम्हाला त्रास देवू शकतात. तुम्ही फक्त कामात फोकस करा. अनावश्यक खर्चापासून सावध राहा. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत घाईगडबड टाळा. महनीय व्यक्तींच्या दर्शनाने मनोबल वाढेल. बायकोच्या नातेवाईकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.

कर्क आर्थिक राशिभविष्य : नोकरी बदलण्यासंदर्भात ठोस निर्णय घ्या

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. तुमची काळजी दूर होणार आहे. ऑफिसच्या कामात प्रगती असून तुम्हाला नवीन काम मिळणार आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यावर ठाम निर्णय घ्या. व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि मान, प्रतिष्ठा वाढेल. घाईगडबड किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय भविष्यात पश्चातापाचे कारण ठरतील. रात्री मित्रांसोबत बाहेर जाण्याची संधी मिळेल.

सिंह आर्थिक राशिभविष्य : कामात अडचण, व्यवसायात त्रास वाढणार

सिंह राशीच्या जातकांसाठी दिवस चांगला नाही. प्रत्येक कामात अडचण आहे. व्यवसायात तुमचा त्रास वाढणार आहे. पुढची ऑर्डर मिळालेली नाही त्यामुळे खर्चाची ताळमेळ कशी करावी याबद्दल तुम्ही काळजी कराल. एखाद्या नातेवाईकामुळे तणाव राहील. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा, पैसे अडकू शकतात. दिवसा कोर्टकचेरीच्या फेऱ्या होतील. अखेरीस तुमचा विजय होईल. तुमच्या विरोधातील षड़यंत्र अपयशी होतील.

कन्या आर्थिक राशिभविष्य : विनाकारण धावपळ, रागावर नियंत्रण हवे

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा आहे. पण विनाकारण धावफळ झाल्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. रचानात्मक कार्यात मन लागेल.कौटुंबिक समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होईल. तुमच्या योजान सफल होणार पण कठोर मेहनत आहे.

तुळ आर्थिक राशिभविष्य : धावपळ होणार, ताण वाढण्याची शक्यता

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ नाही तुमची खूप धावपळ होणार असून तुमची काळजी वाढणार आहे. तुमच्या स्वभावामुळे तुमचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. समस्यांचा डोंगर आहे, पण फोकस केलात तर त्यावर मात करु शकता. हवामानाचा प्रतिकूल प्रभाव प्रकृतीवर पडेल, त्यामुले सावध राहावे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रवास, पर्यटनाची स्थिती सुखद आणि लाभप्रद राहील.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : चांगली बातमी मिळणार, कामात नशिबाची साथ

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस शुभलाभाचा असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. अचानक चांगली बातमी मिळणार आहे त्यामुळे खूप आनंद होईल. कार्यक्षेत्रात तणाव आहे पण तो तुमच्यावर हावी होणार नाही याची काळजी घ्या. तणाव वाढला तर तब्येत बिघडू शकते. कोणासोबत वाद असेल तर त्यावर तोडगा निघेल. बोलण्यावर संयम न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितींनी तोंड द्यावे लागेल. सायंकाळी प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील आणि रात्रीचा वेळ भटकंती आणि मौजमजेत जाईल.

धनू आर्थिक राशिभविष्य : करिअरच्या दृष्टीने दिवस उत्तम

धनु राशीच्या लोकांनी आज दिवस करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे. नवीन संपर्कामुळे तुम्हाला लाभ होणार आहे. तुमची थांबलेली रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. संततीबद्दल जबाबदारीची पूर्तता कराल. आज स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाल आणि थांबलेली कामे पूर्ण होतील. मित्रांसोबत सायंकाळचा वेळ मनोरंजनात जाईल आणि काही पैसे खर्च होतील. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या.

मकर आर्थिक राशिभविष्य : ताणतणाव कमी होईल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून आर्थिक लाभ होईल. तुमचा मान सन्मान वाढणार आहे. मित्रांचा सहवास लाभेल त्यामुळे तणाव कमी होईल. इच्छेनुसार अनुकूल लाभ झाल्याने आनंद होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईळ. व्यवसायात बदलाची योजना बनत आहे. स्पर्धापरीक्षांत यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदारी पूर्ण होईल. वाहनांचा वापर सावधरीत्या करा. वाहन आकस्मिक खराब झाल्याने खर्च वाढतील.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात प्रगती, नवे प्रोजेक्ट मिळणार

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आहे. वरिष्ठांसोबत तुमची ओळख असेल तर त्याचा फायदा होणार आहे. कोणत्याही संपत्तीच्या खरेदी विक्री करण्यापूर्वी नीट माहिती घ्या. सर्व कायदेशीर बाबी नीट पडताळून पाहा. व्यापारात नवे प्रोजेक्ट मिळतील. कामात नियोजन आणि फोकस ठेवा.

मीन आर्थिक राशिभविष्य : ऑफिसच्या कामात उत्तम प्रगती

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभ होईल आणि तुमचे जीवन आनंददायी राहील. ऑफिसच्या कामात उत्तम प्रगती होणार आहे. आज तुम्हाला जवळचा किंवा लांबचा प्रवास करावा लागू शकेल. व्यवसाच्या प्रगतीमुळे आनंदीत राहाल. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून दिलासा मिळेल. सायंकाळी भटकंती वेळी एखादी महत्त्वाची माहिती हाती येईल. तुमचे डोके आज रिलॅक्स राहील. आईवडिलांच्या सल्ल्याने लाभ होईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.