Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weekly Love Horoscope 7 to 13 October 2024 : कुंभसह २ राशींचे जोडीदारासोबत कडाक्याचे भांडण! गैरसमज वाढतील, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

20

Love Horoscope 7 to 13 October 2024 : ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. बुध आणि शुक्राचा संयोग तुळ राशीत होईल. त्यामुळे मेष, कन्या आणि सिंह राशींच्या प्रेम जीवनात आनंद असेल. भविष्याचा विचार कराल. जीवनात शांतता मिळेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटेल. जाणून घेऊया मेष ते मीन पर्यंतच्या १२ राशींचे प्रेम राशीभविष्य सविस्तर.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Weekly Love Horoscope 7 to 13 October 2024 : कुंभसह २ राशींचे जोडीदारासोबत कडाक्याचे भांडण! गैरसमज वाढतील, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?
Saptahik Love Rashifal :
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. बुध आणि शुक्राचा संयोग तुळ राशीत होईल. त्यामुळे मेष, कन्या आणि सिंह राशींच्या प्रेम जीवनात आनंद असेल. भविष्याचा विचार कराल. जीवनात शांतता मिळेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटेल. अहंकाराचा संघर्ष टाळा. या आठवड्यात तुम्हाला मदत मिळेल. मैत्रीपूर्ण व्यक्तीमत्त्वामुळे प्रेम जीवनात आनंदी व्हाल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. जोडीदाराच्या सहवासात तुम्हाला आराम वाटेल. प्रेमसंबंधात हा आठवडा संमिश्र राहिल. संयम बाळगा कोणत्याही वादात पडू नका. जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्यातील या आठवड्याचे साप्ताहिक प्रेम भविष्य.

मेष साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- प्रेम जीवनात आनंद

मेष राशीच्या लोकांचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. तुमचे वैवाहिक जीवन रोमान्सने भरलेले राहिल. या प्रेम जीवनात आनंदी असाल. भविष्याचा विचार कराल. जीवनात शांतता मिळेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटेल. अहंकाराचा संघर्ष टाळा.

वृषभ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- विचारपूर्वक निर्णय घ्या

वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रेम संबंधांमध्ये परस्पर प्रेम अधिक घट्ट होतील. वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात आनंद आणि शांती मिळेल. या आठवड्यात तुम्हाला मदत मिळेल. मैत्रीपूर्ण व्यक्तीमत्त्वामुळे प्रेम जीवनात आनंदी व्हाल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.

मिथुन साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- मन अस्वस्थ राहिल

मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या प्रेम जीवनाबद्दल थोडी चिंता वाटेल. मन अस्वस्थ राहिल. प्रेम जीवनात शांतता वाटेल. एकटे वेळ घालवल्याने मन शांत होईल. जोडीदाराच्या सहवासात तुम्हाला आराम वाटेल. प्रेमसंबंधात हा आठवडा संमिश्र राहिल. संयम बाळगा कोणत्याही वादात पडू नका.

कर्क साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- जोडीदारासोबत वेळ घालवाल

कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा प्रेम जीवनसाठी आनंददायी असेल. तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीवरुन वाईट वाटेल. सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील. परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. तुम्ही प्रेम जीवनात आनंदी व्हाल. जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

सिंह साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- नात्यात प्रेम वाढेल

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमसंबंधात अनुकूल असेल. या आठवड्यात समतोल राखून जीवनात पुढे गेल्यास आनंदी राहाल. स्त्रीच्या मदतीने जीवनात आनंद मिळेल. प्रेम जीवनात परस्पर प्रेम वाढेल. नात्याबद्दल थोडे सकारात्मक राहाल. गोष्टी स्वत:हून मॅनेज केल्यास बरे होईल.

कन्या साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- विचारपूर्वक निर्णय घ्या

तुमच्यासाठी हा आठवडा प्रेमात आनंदाने भरलेला असेल. चांगल्या भविष्यासाठी काही ठोस निर्णय घ्याल. प्रेम जीवनात सकारात्मक टप्प्याकडे वाटचाल कराल. जीवनात शांतता वाढेल. आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक निर्णय घ्याल. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल.

तुळ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- नात्यात अंतर वाढेल

या आठवड्यात प्रेम जीवन उज्ज्वल होईल. तुमचे परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. हा काळ अतिशय अनुकूल राहिल. तिसऱ्या व्यक्तीमुळे प्रेमसंबंध बिघडतील. जोडीदारासोबत गैरसमज होतील. एकत्र बसून सोडवण्याचा सल्ला मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये अंतर वाढेल.

वृश्चिक साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- समस्या येतील

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत संमिश्र असेल. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. हा आठवडा तुमच्या प्रेमसंबंधांसाठी त्रासदायक ठरेल. नात्यात तणाव जाणवेल, त्यामुळे मन अस्वस्थ राहिल. काही तरी नवीन करण्याचा विचार कराल

धनु साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- प्रेमात सुखद अनुभव

धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रेमसंबंधात हुशारीने वागावे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदाराच्या जवळ येऊ शकाल. प्रेमात सुखद अनुभव मिळतील. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल. तुमचे मन काही गोष्टींबद्दल अस्वस्थ राहिल. प्रेम जीवनात त्रासही वाढेल

मकर साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- जीवनात आनंद येईल.

लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी असेल. तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. वडिलांच्या मदतीने जीवनात आनंद मिळेल. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च कराल. जोडीदारासोबत नवीन काही करण्याचा विचार कराल

कुंभ साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- नात्यात वाद होतील

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत समस्यांनी भरलेला असेल. जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे नात्यात अंतर येईल. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. भावनिकदृष्ट्या व्यथित राहाल. लव्ह लाईफमध्ये अस्वस्थता वाढेल. तुमच्या वाद होतील.

मीन साप्ताहिक प्रेम राशीभविष्य- गैरसमज वाढतील

या आठवड्यात मीन राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधात शांतता राहिल. त्यांच्या प्रेम जीवनात सुख आणि समृद्धीचे शुभ संयोग घडतील. मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ राहिल. तुमच्या आळशीपणा संचारेल. त्यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. प्रेमाच्या बाबतीत थोडा विवेक वापरण्याचा सल्ला मिळेल. अन्यथा, नात्यात गैरसमज वाढतील.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.