Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 9 ऑक्टोबर 2024: सतर्क राहा, फसवणुकिची शक्यता ! अडचणींचा सामना करावा लागेल ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 9 October 2024 : बुधवार, 9 ऑक्टोबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. मूलांक 2 साठी व्यापारात लाभ आहे. मूलांक 4 असणाऱ्यांनी सतर्क राहा कारण जवळची व्यक्ती फसवणूक करण्याची शक्यता आहे. मूलांक 5 चे ऑफिसमध्ये कौतुक होणार आहे. मूलांक 7 असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. तर मूलांक 8 चा ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मूलांक 9 च्या जातकांना व्यवसाय वाढीचे मार्ग सापडतील. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – सर्व कामे मार्गी लागतील
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. धनसंपत्तीच्या बाबतीत वेळ शुभ आहे. व्यवसायात नफा आणि प्रगती आहे. गुंतवणुकिचा विचार करत असाल तर वेळ उत्तम आहे, भविष्यात चांगला लाभ मिळेल. ऑफिसमध्ये वातावरण अनुकूल असेल. कुटुंबात वातावरण समाधानी असेल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाणार आहे.
मूलांक 2 – व्यापारात लाभ, आर्थिक गुंतवणुक करा
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस उत्तम असून तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यापारात लाभ आहे आणि तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे त्यामुळे गुंतवणुकिचा विचार नक्की करा. कार्यक्षेत्रात कामे मार्गी लागल्यामुळे तणाव कमी होईल. रात्री कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील.
मूलांक 3 – अडचणींचा सामना करावा लागेल
मूलांक 3 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. तुमची कामे पूर्ण होताना काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही गुंतवणूक करत असाल तर विचारपूर्वक करा किंवा तज्ज्ञाचा सल्ला घ्या. व्यापारात वाढ तुमच्यासाठी लाभदायक आहे. ऑफिसमध्ये विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील तुम्ही सावध राहा. घरात वातावर ठिक असेल तुम्हाला अडचणीत नक्की मदत मिळेल.
मूलांक 4 – सतर्क राहा, फसवणुकिची शक्यता
मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला व्यापारात खूप फायदा होणार आहे. तुम्हाला खूप सतर्क राहण्याची गरज आहे कारण आज तुमच्या जवळची व्यक्ती तुमची फसवणूक करणार आहे. कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा आणि पटकन एखादा निष्कर्ष काढू नका. धनसंपत्तीच्या बाबतीत दिवस ठिक आहे. कुटुंबात वातावरण समाधानी असेल तसेच जोडीदाराची प्रत्येक कामात साथ मिळेल.
मूलांक 5 – ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार
मूलांक 5 साठी आजचा दिवस चांगला आहे तसेच तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळेल. धनसंपत्ती वाढणार आहे, त्यामुळे गुंतणुकिचा विचार करु शकता. व्यापारी वर्गासाठी दिवस अनुकूल आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. कुटुंबासोबत संध्याकाळी वेळ अगदी आनंदात जाणार आहे. जोडीदारासोबत संबंध अधिक मधुर होतील.
मूलांक 6 – नोकरी बदलण्याचा विचार पुढे ढकला
मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही गुंतवणूकिचा विचार करु शकता पण त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो निर्णय पुढे ढकला. ऑफिसमध्ये वातावरण ठिक असेल कामात फोकस करा. आज कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबात वातावरण ठिक असेल जोडीदारासोबत काही वैचारिक मतभेद होवू शकतात पण तुम्ही संयमाने वागा.
मूलांक 7 – तब्येतीची काळजी घ्या
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून तुमची आर्थिक स्थीती सुधारणार आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. व्यापारात उत्तम यश आहे. व्यवसायात तुम्ही बदल करण्याचा विचार करत होतात त्यासाठी आता वेळ चांगली आहे. घरात तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगल्याप्रकारे व्यतीत होणार आहे.
मूलांक 8 – ताणतणाव वाढण्याची शक्यता
मूलांक 8 साठी दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो विचार पुढे ढकला. व्यवसायात आज नवीन प्रस्ताव किंवा प्रोजेक्ट आले तर त्वरित तुमचा निर्णय कळवू नका. नोकरी करणाऱ्यांचा ताण तणाव वाढेल पण कामात फोकस करा. आज कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा म्हणजे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज ताण अधिक वाढल्यामुळे तुम्ही थोडे चिडचिडे व्हाल.
मूलांक 9 – व्यवसाय वाढीचे मार्ग सापडतील
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुमची सगळी कामे यशस्वी होणार आहेत. व्यापार वाढविण्यासाठी तुम्ही नवे मार्ग शोधत होता त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुमच्यातील अहंकार वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही कृती करताना तुम्ही सावध राहा. कुटुंबासोबत दिवस उत्तम असेल, जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल.