Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जनमताचा कानोसा घेण्यासाठी एक सर्व्हे केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा सर्व्हे करण्यात आला.
राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५चा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान पाहता महाविकास आघाडीला विधानसभेच्या १५८ मतदारसंघांमध्ये आघाडी होती. तर महायुती १२५ जागांवर पुढे होती. पण गेल्या पाच महिन्यांत परिस्थिती बदलली असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्व्हे सांगतो. या सर्व्हेनुसार महायुतीला १६० जागा मिळू शकतात.
Shiv Sena UBT Candidate List: शिंदेंच्या मंत्र्यांविरोधात ठाकरेंचे शिलेदार; बहुतांश जणांमागे ‘भाजप फॅक्टर’; पाहा पूर्ण यादी
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात जबर फटका बसला. पण आता महायुती त्या धक्क्यातून सावरली असल्याचं संघाचा सर्व्हे सांगतो. महायुती विधानसभा निवडणूक जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ‘राज्यातील परिस्थिती, जनमानसाचा कानोसा घेण्यासाठी संघ गोपनीय पद्धतीनं अंतर्गत सर्व्हेक्षण करत असतो. त्याच आधारावर भाजपची निवडणूक रणनीती ठरते. लोकसंख्या, मतदारांचा पॅटर्न पाहून उमेदवारांची निवड केली जाते,’ असं संघाशी संबंधित एकानं सांगितलं. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात संघानं राज्यातील २८८ मतदारसंघांत सर्व्हे केला होता.
Aaditya Thackeray: वरळीत हायप्रोफाईल फाईट, आदित्य ठाकरेंसमोर मराठी अभिनेत्याचं आव्हान? CMच्या निर्णयाकडे लक्ष
महायुती विधानसभेला १६० जागा जिंकेल असं संघाचा सर्व्हे सांगतो. यातील ९० ते ९५ जागा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं राज्यात १०० जागांचा टप्पा ओलांडला आहे. पण यंदा भाजप १०० जागांच्या आत असेल, असा कयास आहे. त्यामुळे भाजपची हॅट्ट्रिक हुकेल अशी दाट शक्यता आहे.
RSS Survey for Maharashtra Election: भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, किती जागा जिंकणार? संघाचा सर्व्हे आला; दादा, शिंदेंचं काय होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४० ते ५० जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपच्या कामगिरीवर असंतुष्ट होऊन इंडिया आघाडीला मतदान केलेले मतदार या सर्व्हेच्या केंद्रस्थानी होते.