Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तरबाबत दोन दिवसात उत्तर मिळेल असे सुचक वक्तव्य केले.
कोल्हापूर उत्तर मधील सर्व इच्छुकांबरोबर चर्चा झाली आहे. खा. शाहू महाराज मालोजीराजे हे देखील सोबत उपस्थित होते. उमेदवार मुलाखतीत दिलेल्यांपैकी असेल याबाबत उत्सुकता जास्त आहे तर आणखी दोन दिवस थांबावं लागेल. गैरसमजाचा कोणताही मुद्दा नाही काही गैरसमज असतील तर चर्चेने सोडवले जातील, मी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून महाविकास आघाडी सोबतच राहतील अशी अपेक्षा आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करावा असे वाटत असते. मात्र राज्यातील लोकांचा विश्वास महाविकास आघाडी सोबत आहे.
MNS Third List: मनसेची तिसरी यादी जाहीर, आणखी १३ जणांची उमेदवारी; आतापर्यंत किती मतदारसंघात उमेदवार दिले?
कोल्हापूरची फसवणूक केली
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालेली नाही कोल्हापूरकर आणि महाराष्ट्राचेही घोर फसवणूक आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूरचं नाव वगळतात मग हा मार्ग कुठून जाणार कोल्हापूर वगळून हवेतून फ्लाय ओव्हर करणार काय? असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या बाजूची महायुतीची भूमिका असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं ही शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे. 15 ऑक्टोबरचा अध्यादेश असेल तर इतका दिवस शासनाने हा अध्यादेश का दाखवला नाही, तो 15 तारखेला जाहीर करायला हवा होता सरकारमध्ये फसवण्याचे निर्णय आचारसंहिता लागल्यावर सुद्धा घेतले जात असल्याचे शंका आहे. मागच्या तारखा दाखवून सह्या केल्या जात आहेत का याची शंका आहे. अध्यादेश जारी झाल्यानंतर 7 दिवस थांबायची काय कारण होते, याचा अर्थ निव्वळ फसवण्यासाठी मागची तारीख टाकून दिलं जात आहे. तुम्ही हसन मुश्रीफ यांच्याकडून खुलासा घेतला पाहिजे, मंत्री मुश्रीफ यांनी 22 ऑक्टोबरला याबाबतचा अध्यादेश संजय घाटगे यांच्याकडे सुपूर्त केला होता यावरून सतेज पाटलांनी मुश्रीफ यांना लक्ष केलं.
फडणवीसांनी कौशल्याने मिटविला काळे-कोल्हे संघर्ष; आता महाविकास आघाडीची मोठी अडचण, दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ
मते विकत घेण्याचा षडयंत्र महायुती करत आहे
महिलांना पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे देऊन महागायची फोडणी पडली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला निवडणुकांसाठी पैशांचा वारेमाप खर्च होतोय. पोलीस 5 कोटी संदर्भात तत्परता का दाखवत नाहीत, 15 कोटी होते आणि दहा कोटी परत गेले अशी चर्चा सुरू आहे. तेथील दोन गाड्या होत्या अशी माहिती आहे. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कुठे मिळत नाहीत अशी माहिती आहे, मग ते डिलीट करण्यात आले का आणि त्या दोन गाड्या कुठे गेल्या? मतं विकत घेण्याचा षडयंत्र महायुती करत आहे, मात्र जनता याला फसणार नाही, असे ते म्हणाले.