Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बारामतीत अखेर पुन्हा काका पुतण्याचीच लढत अटळ! अजित पवारांविरुद्ध लढणार युगेंद्र पवार; संंपूर्ण देशाची नजर महाराष्ट्रातील या मतदारसंघावर
Baramati Assembly constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर झाली आणि गेल्या ३-४ महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाला. बारामती विधानसभा मतदारसंघातून काका अजित पवार विरुद्ध पुणणे युगेंद्र पवार अशी लढत होणार हे नक्की झाले.
आता बारामती पुन्हा एकदा दुसऱ्या एका लढाईसाठी सज्ज झाली आहे. आता देखील ही लढाई काका आणि पुतण्यातच होणार आहे. ही लढाई अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सखे पुतणे युगेंद्र पवार यांच्यातच होणार आहे.
दोन दिवसापासून अजित पवारांच्या नावाचे फलक असलेल्या रिक्षा व त्यांच्या नावाचे मतदानाचे आवाहन करणारे फलक बारामती दिसल्यानंतर कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेऊन नाराजी व्यक्त केली होती. ती नाराजी व्यक्त करताना मी आठ ते नऊ निवडणुका लढलो, पण जर कितीही कामे करून आपल्याला जर खडा लागत असेल, तर त्या वाटेला जायला नको असे सुरुवातीला अजित पवारांनी सांगितले आणि राज्यात सगळीकडे चर्चा सुरू झाली की, आता अजित पवार बारामती लढणार नाहीत. त्याचवेळी अजित पवारांचे दुसरे पुत्र जय पवार यांनी जर दादांनी परवानगी दिली तर बारामतीतून लढायला आवडेल असे वक्तव्य केल्याने या संभ्रमात आणखीनच भर पडली.
मध्यंतरी काही दिवस गेले आणि कार्यकर्त्यांनी मागोवा घेत अजित पवारच येथे पाहिजेत असा सूर लावला. तो सूर एवढा आक्रमक बनत गेला की, नंतर अजित पवारांच्या वाहना समोरच कार्यकर्ते झोपले आणि त्यांनी अजित पवारांनी आत्ताच उमेदवारी जाहीर करावी असा तगाजा लावला. हे सगळे महाभारत घडत असतानाच अजित पवारांनी चार दिवसापूर्वी एका मेळाव्यात बारामतीकरांना तुमच्या मनातीलच उमेदवार असेल असे वक्तव्य केले आणि कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. मात्र जोपर्यंत अजित पवार त्यांची उमेदवारी जाहीर करत नाहीत तोवर काही खरे नाही असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि बारामती मध्ये पहिल्यांदाच अजित पवारांच्या नावाच्या रिक्षा धावू लागले आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनाच बारामतीतून उमेदवारी देणार हे आता स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीत आत्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी हिरीरीने भाग घेतलेले युगेंद्र पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असतील अशी चर्चा पहिल्यापासूनच सुरू होती. एवढेच नाही, तर युगेंद्र पवार यांची समर्थक देखील शरद पवारांकडे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लागलीच गेले आणि त्यांनी शरद पवारांकडे युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी केली. त्यानंतर सातत्याने बारामती तालुक्यात युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू होती आणि युगेंद्र पवार यांनी देखील त्याचा कधीच इन्कार केला नाही. मात्र आपण उमेदवार असू याला दुजोरा देखील दिला नाही.
मात्र आता योगेंद्र पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीतील शिलेदार असतील हे मात्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळेच बारामती पुन्हा एकदा इतिहास घडण्याची चिन्हे आहेत काका आणि पुतण्याच्या लढतीत आतापर्यंत काका मात्र ठरले आहेत काका सरच ठरले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत हीच परंपरा कायम राहणार का..? की वेगळा इतिहास घडणार आणि बारामती शरद पवारांची की अजित पवारांची यावर्षी का मूर्तपणार याकडे पुन्हा एकदा राज्याचेच नाही देशाचेही लक्ष लागले आहे. कारण शरद पवारांची साथ सोडून अजित पवार भाजपच्या सोबतीला गेलेले आहेत हे कोणालाच पटलेले नाही. त्याचाच निकाल बारामतीने मोठ्या प्रमाणावर विकास कामे करूनही अजित पवारांना पराभवाचा धक्का देत दाखवून दिले आहे. आता त्याचाच कित्ता मतदार घडवणार की विकासाच्या बाजूने अजित पवार म्हणत असतील तशाप्रकारे कौल देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळेच बारामतीची लढत ही हाय प्रोफाईल लढत म्हणून पाहिले जात आहे.