Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Yugendra Pawar Baramati Vidhan Sabha : बारामतीमधून शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवार यांचं भावनिक वक्तव्य, मी फक्त या कारणासाठी निवडणूक लढवणार…
बारामतीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने युगेंद्र श्रीनिवास पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे.
Solapur News : शरद पवारांनी भाकरी फिरवली; राहुल गांधीच्या पठ्ठ्याला बाजूला करत महेश कोठेंना तिकीट
युगेंद्र पवार पुढे बोलताना म्हणाले की, उमेदवारी मिळाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर आत्मविश्वास दाखवला, विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. यापुढे बारामतीच्या जनतेसाठी आणि सर्वसामान्यांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करेन, अशी ग्वाही युगेंद्र पवार यांनी दिली.
शरद पवारांची चर्चा करणार..!
महागाई, भ्रष्टाचार, पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, बेरोजगारी, वाड्या वस्तूंवरील पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न ही कामे मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. दोन-तीन दिवसांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करून पक्षाशी बोलणे झाल्यावर सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी अर्ज दाखल भरण्याची तारीख ठरेल, असेही ते म्हणाले.
Pathri Vidhan Sabha : महायुतीमध्ये बिघाडी, पाथरी मतदारसंघ अजित पवार गटाला; शिंदेंचा शिलेदार आता अपक्ष लढणार
कोण आहेत युगेंद्र (दादा) श्रीनिवास पवार?
– प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास अनंतराव पवार आणि शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला (वहिनी) श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव
– जन्म – २२ एप्रिल १९९१
– शिक्षण- माध्यमिक शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल स्कूलमध्ये, तर उच्च शिक्षण अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठ बोस्टन येथे झाले असून फायनान्स आणि इन्शुरन्स विषयात पदवी घेतली आहे.
– गेल्या पाच वर्षापासून शरयू उद्योग समूहामध्ये विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. त्यामध्ये फलटण येथील शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पदावर काम करून साखर उद्योग क्षेत्रात यशस्वी पदार्पण
– भारताचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र ऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फा संस्थेची स्थापना केली.
– शिक्षण क्षेत्रातील नामांकित अशा विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या खजिनदार पदी नियुक्ती.
– मे २०२२ मध्ये बारामती तालुका कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
– डिसेंबर २०२३ आणि एप्रिल २०२३ मध्ये बारामतीमध्ये प्रथमच भव्य असे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे यशस्वी आयोजन केले, यामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग
– बारामती आणि परिसरामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य क्रीडा शेती जलसंधारण क्षेत्रात सतत कार्यरत.
– नैसर्गिक संकटात नागरिकांना आर्थिक मदतीचा हात
– शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून हजारो अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना पोकलेन मशीनद्वारे विहिरींची मोफत खोदाई करून देण्यात आली असून शेकडो ओढ्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे.
– दुष्काळी परिस्थितीमध्ये बारामतीच्या पश्चिम भागातील कायम पाणीटंचाई असणाऱ्या शेकडो गावांना शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा.
– कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक तरुण-तरुणींना भरीव आर्थिक मदत आणि मार्गदर्शन लाभत असून आज अनेक मुले यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत.
– गावोगावच्या सतत येणाऱ्या अडचणी, त्यामध्ये विज, रस्ते, पाणी, घरदुरुस्ती, वादळी वारे, पाऊस काळात होणारे नुकसान यासाठी अविरत कार्यरत, तर सरकारी योजना पोहोचण्या आधीच शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि स्वनिधीतून हजारो गरजूंना मदतीचा हात दिला आहे.