Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
NCP Shirur Candidate Mauli Katke: राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही आज जाहीर केली. यामध्ये शिरुर येथून माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमध्येही जागावाटपावरुन संघर्ष पाहायला मिळाला. अनेक मतदारसंघांबाबत रस्सीखेच सुरु होती. अद्यापही काही जागांचा तिढा सुटलेला नाही. मात्र, आता महायुतीतील जागावाटपाचा गुंता बऱ्यापैकी सुटलेला दिसत आहे. त्यापैकीच एक असलेल्या शिरूर विधानसभा मतदारसंघाचा तिढाही सुटला आहे. या मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होणार आहे. अशोक पवार यांच्याविरोधात माऊली कटके हे निवडणुकीच्या मैदानात असतील. याशिवाय, अजित पवार गटाच्या पुणे जिल्ह्यातील सर्वच जागाचा तिढा सुटला आहे.
Sunil Tingre: काय पोर्शे, काय पिझ्झा, काय अग्रवाल; सारं बाजूला ठेवत अजितदादांची पुन्हा सुनिल टिंगरेंना संधी
राष्ट्रवादी अझित पवार गटाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये त्यांनी सात उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत पुणे विभागातून वडगाव शेरी आणि शिरुर मतदारसंघात उमेदवार देण्यात आला आहे. वडगाव शेरी येथून विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर, शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले माऊली कटके यांनी हाती घड्याळ बांधल्यानंतर शिरुर येथून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. ते अशोक पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
महाकालच्या दर्शनाने माऊली कटके चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून माऊली कटके हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी नागरिकांना उज्जैन महाकालचे दर्शन घडवले होते. आपल्या मतदारसंघातील अबालवृद्धांना त्यांनी महाकालचे दर्शन घडवून आणल्याने त्यांची शिरुर शहर, पुर्व भाग आणि हवेलीत सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच त्यांचा अनेकांशी थेट संपर्क असल्याने शिरुरची लढत तुल्यबळ होणार असल्याची चर्चा आहे.
Sharad Pawar Vs Ajit Pawar: शिरुरमध्ये कांटे की टक्कर, शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात दादांचा तगडा नेता मैदानात
राष्ट्रवादीच्या यादीत सात जणांना उमेदवारी घोषीत
इस्लामपूर – निशिकांत पाटील
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
अणुशक्तीनगर – सना मलिक
वडगाव शेरी – सुनिल टिंगरे
शिरुर – ज्ञानेश्वर कटके
तासगाव – संजयकाका पाटील
लोहा कंधार – प्रताप पाटील चिखलीकर