Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nagar Sandip Kotkar: दुहेरी हत्याकांडातील पीडित कुटुंबाने कोतकर यांच्यासह दोनशे जणांनी घरासमोर येऊन धमकावल्याची फिर्याद दिल्याने तोही दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हायलाइट्स:
- उमेदवारीसाठी दंड थोपटले
- अर्ज दाखल करण्याआधीच गुन्हा दाखल
- संदीप कोतकर नगरमध्ये येताच काय झाले?
Pune Gold Seized: पुण्यात सापडलं घबाड, १३८ कोटींचं सोनं जप्त, ऐन निवडणुकीत शहरात खळबळ
संदीप कोतकर यांना लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यांच्यावरील जिल्हा बंदीची अट उच्च न्यायालयाने शिथील केली आहे. मात्र, केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात असलेली जिल्हा बंदीची अट शिथील करण्याबाबत त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. त्याची गुरुवारी (२४ ऑक्टोबर) सुनावणी होती. त्यासाठी ते नगरला आले होते. मात्र, त्याआधी केडगावमध्ये त्यांनी विना परवाना रॅली काढली व जाहीर सभा घेतली तसेच सायंकाळी केडगावातील नेप्ती रोडवर राहणार्या माजी नगरसेविका सुनीता संजय कोतकर यांच्या घरासमोर शक्तीप्रदर्शन करीत दंड थोपटल्याच्या दोन स्वतंत्र तक्रारींवरून संदीप कोतकरसह सुमारे दोनशेजणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
संग्राम संजय कोतकर (वय ३२ वर्षे, रा. अर्चना हॉटेल मागे, नेप्ती रोड, केडगाव, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या आई सुनीता संजय कोतकर या प्रभाग १६ च्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी मुलगा संग्राम कोतकर याला फोनवर कळवले की, संदीप कोतकर याने जिल्हा बंदीची अट शिथील झाली अशी चुकीची माहिती देऊन केडगाव येथे जेसीबी व क्रेन लावून फटाके फोडत रॉली काढली. या रॉलीत अंदाजे पाचशे ते सहाशे लोकांचा जमाव होता. त्या जमावामधील लोक आपल्या घरासमोर आले व घरासमोरील रोडवर मोटार सायकली व चार चाकी गाड्या उभे करुन मोठ्याने घोषणा देऊ लागले. त्यावेळी त्यातील काहीजण घरासमोर आले. त्यामध्ये संदीप कोतकर हाही होता.
संदीप कोतकर हा आपल्या घराकडे बघून दंड थोपटत होता. त्याच्यासोबत असलेल्याने जसे यांच्या वडीलांचे केले आहे, तसे यांचेही करु. यांनी आपल्या माणसाला त्रास दिलेला आहे, असे म्हणून शिवीगाळ करत होते. त्यावेळी मला गल्लीतील एका अल्पवयीन मुलाने त्या घटनेचा व्हीडिओ माझ्या मोबाईल नंबर पाठवला. मी तो व्हीडीओ पाहिला असता माझ्या घरासमोर दंड थोपटून दहशत करणारे तसेच शिवीगाळ व दमदाटी करणारे संदीप भानुदास कोतकर, सचिन भानुदास कोतकर, विनोद लगड, निलेश बाप्पू सातपुते, भूषण अशोक गुंड, रमेश तात्याभाऊ कोतकर, विजय कोतकर, अशोक रावसाहेब कोतकर, संताष बारस्कर, सोमनाथ बन्सी कराळे, अशोक मोहन कराळे, ऋषीकेश हरि सातपुते, गणेश पांडुरंग सातपुते, गणेश अंजाबापू सातपुते, सागर अंजाबापू सातपुते, भुषण सोनु सुपेकर, अभिषेक रावसाहेब ठुबे, साकेत हरी सातपुते, महेश कांबळे, राहुल दादु कांबळे, किशोर जेजुरकर, नुर मोहमद पठाण, बाबसाहेब टगोर बाबा कोतकर, सिराज शेख, विशाल बाळासाहेब कोतकर व इतर दोनशे (सर्व रा. केडगाव, ता. जि. अहिल्यानगर) यांनी माझ्या घरासमोर येऊन दहशत निर्माण करुन, शिवीगाळ करुन धमकी दिली.
‘एक नवी सुरुवात…’ MHJ फेम पृथ्वीक प्रताप अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत दिलं सरप्राइज
पोलिसांनीही दिली फिर्याद
पोलिस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे यांनी दुसरी फिर्याद दिली आहे. ते पोलिसांच्या फ्लाईंग स्कॉडमध्ये काम करीत आहेत. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री साडेनऊ दरम्यान रेणुकामाता मंदिर केडगाव ते एकनाथ नगर केडगाव (अहिल्यानगर) अशी संदीप भानुदास कोतकर (रा एकनाथनगर केडगाव), सुनील सर्जेराव कोतकर (रा केडगाव अहिल्यानगर), संतोष सुखदेव बारस्कर (रा. केडगाव), . गणेश आंनदकर (रा कायनेटीक चौक, अहिल्यानगर), जालिंदर कोतकर (रा केडगाव, अहिल्यानगर) यांनी २०० ते २५० लोकांना एकत्र जमवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन विनापरवाना रॅली काढून, एकनाथ नगर केडगाव येथे सभा घेवुन त्यामध्ये विनापरवना ध्वनीक्षेपकाचा वापर केला आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.