Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भाजप स्टार प्रचारक महाराष्ट्र गाजवणार; पंतप्रधान, ७ मुख्यमंत्री, डझनभर आजी-माजी केंद्रीय मंत्री उतरणार
BJP Campaign For Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारक महाराष्ट्रात प्रचार करणार आहे. ७ राज्यातील मुख्यमंत्री, पंतप्रधान असे अनेक आजी – माजी मंत्री प्रचारासाठी उतरणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील पहिल्या, दुसऱ्या यादीत ६७ पैकी इतक्या ‘लाडक्या बहिणी’, पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ ते १३ सभा होण्याचा अंदाज आहे. विदर्भात गोंदिया आणि अकोला येथे जाहीर सभा करण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. स्टार प्रचारकांमध्ये भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंह सैनी, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, संघटन सहसचिव शिवप्रकाश, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच, विदर्भातून वन मंत्री सुधार मुनगंटीवार, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री डॉ. संजय कुटे स्टार प्रचारक आहेत.
धक्कादायक! लग्नाच्या संकेतस्थळावर फेक बायोडेटा, महिला पोलिसाची फसवणूक; गर्भवती राहिल्यावर अश्लील व्हिडिओ व्हायरल
भाजप स्टार प्रचारक महाराष्ट्र गाजवणार; पंतप्रधान, ७ मुख्यमंत्री, डझनभर आजी-माजी केंद्रीय मंत्री उतरणार
भाजपकडून सभा, रोड शो आणि बैठकांबाबत व्युहरचना आखली जात आहे. बहुतांश जिल्ह्यात अन्य राज्यातील नेत्यांकडे आधीच जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय दोन महिन्यांपासून नागपूर शहर आणि ग्रामीणमधील बारा जागांसाठी विविध घटकांच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी मतांचे कारण, संघटनात्मक स्थिती, जनतेची अपेक्षांबाबत त्यांनी नागरिकांचे मत जाणून घेतले. त्यानुसार पक्षाकडून काम केले जात आहे.
निवडणुकीच्या नामांकन अर्जासाठी मंगळवारी अखेरचा दिवस असल्याने त्या दिवशी लढतीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. दीपोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे ५ तारखेनंतर प्रचाराला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान बड्या नेत्यांच्या सभा होण्याची शक्यता पक्षाकडून वर्तवण्यात येत आहे.