Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उबाठा गटाचे सामुहिक राजीनामे ना मंजूर, निष्ठावंतांनी एकत्र येऊन गद्दार पोपटाचा डोळा फोडा मातोश्रीवरुन आदेश

4

Matheran Shiv Sena Collective Resignation Rejected Uddhav Thackeray : माथेरानमध्ये उबाठा गटातील शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामे दिले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी हे राजीनामे नामंजूर करत शिवसैनिकांना गर्भित इशारा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरानमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामे देत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांनी त्यांचे राजीनामे हे ईमेलद्वारे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. मात्र, काही तासांत त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. एवढेच नाही तर तुम्ही निष्ठावंत आहात आणि गद्दारांचा बंदोबस्त करून त्यांना पराभूत करायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे माथेरानमधील ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी पुन्हा एकवटले असून एकदिलाने नितीन सावंत यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना महायुतीमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना उबाठा गटाचे माथेरान शहरातील माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, माजी गट नेते प्रसाद सावंत आणि नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी सुधाकर घारे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांना पाठिंबा जाहिर केला होता.
भाजप स्टार प्रचारक महाराष्ट्र गाजवणार; पंतप्रधान, ७ मुख्यमंत्री, डझनभर आजी-माजी केंद्रीय मंत्री उतरणार
कर्जत -खालापूर विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. त्या गटात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेल्या महेंद्र थोरवे या आमदारांनी बंड करत शिंदे गटात जाऊन गद्दारी केली. गद्दारी करणारा आमदार हा पुन्हा शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी लढवत असल्याने, ठाकरे गटाचा विजय व या बंडखोराचा पराजय हा शिवसेना उबाठा गटाचा मुख्य मनसुबा आहे. महायुतीमधील असलेल्या या मतदार संघातील बंड पाहाता सध्या कर्जत विधानसभा मतदार संघात विविध पोलनुसार उबाठा शिवसेना गटाचे उमेदवार नितिन सावंत हे तीन नंबरवर जातील अशी चर्चा आहे.

यानुसार अपक्ष निवडणूक लढवणारे सुधाकर घारे आणि महायुतीचे आमदार थोरवे यांच्यात मुख्य लढत होणार असल्याने बंडखोर याचा पराजय होण्याप्रति आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर कोणतीही टीका – टीपणी न करता आणि पक्षात राहून पक्ष विरोधी असल्याचे आमच्यावर आरोप होऊ नये म्हणून आमचे सामुहिक राजीनामे देत आहोत असं सांगण्यात आलं. आम्ही सुधाकर घारे यांना आमचा पाठिंबा देत असल्याचे माजी नगरसेवक, गट नेते प्रसाद सावंत आणि माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव यांच्यासह माजी नगराध्यक्षा, माजी नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सामूहिक राजीनामा देत असल्याचं आणि पक्षश्रेष्ठी तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे मेलद्वारे आमचा सामूहिक राजीनामा पाठवल्याचे जाहीर केले होते.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील पहिल्या, दुसऱ्या यादीत ६७ पैकी इतक्या ‘लाडक्या बहिणी’, पाहा संपूर्ण यादी
या सामूहिक राजीनाम्याची दखल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माजी नगरसेवक, गट नेते प्रसाद सावंत आणि माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव यांच्यासह सर्वांचा मातोश्री येथे बोलावून सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि शिवसैनिकांना राजीनामा नामंजूर केला असून पुढील निवडणुकीमध्ये कामाला लागा असे सांगितले आहे. यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, किशोरीताई पेडणेकर, अनिल परब, विनायक राऊत आणि शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत ही आपली हक्काची व्यक्ती असून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असेही सांगितले आहे.
Raigad Silver Seized : ऐन विधानसभा निवडणुकीत पिकअपमधून मोठं घबाड हाती; कोट्यवधीची चांदी जप्त

उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना गर्भित इशारा

मिंधे गटाचे पक्षाशी गद्दारी केलेले विरोधी उमेदवाराचे नाव न घेता काहीही करून तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन पोपटाचा डोळा फोडा असा गर्भित इशारा मातोश्रीवरून ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला.

कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी निवडी बद्दल जो काही संभ्रम असल्याने, माथेरानमधील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा पदाधिकारी व शिवसैनिक यांनी सामूहिक राजीनामा दिला. त्यानंतर आम्हाला उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून साहेब आणि सेनेचे दिग्गज नेते यांनी आमचा संभ्रम दूर करत तुम्ही निष्ठावंत आहात, तुम्ही निवडणुकीमध्ये कामाला लागा असे सांगितले असल्याचे, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद, माजी नगरसेवक, प्रसाद सावंत यांनी सांगितले.

उबाठा गटाचे सामुहिक राजीनामे ना मंजूर, निष्ठावंतांनी एकत्र येऊन गद्दार पोपटाचा डोळा फोडा मातोश्रीवरुन आदेश

आमच्या राजीनाम्याची दखल घेत आम्हाला पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी मातोश्रीवर बोलवले व भरपूर वेळ देत आमच्याशी चर्चा करून, शिवसेनेने निष्ठावंत उमेदवार दिला आहे. तुम्हीही माथेरानचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात, माथेरान या आधी ही तुम्ही संभाळला आहे व पुढे ही तुम्हाला संभाळायचे आहे. तुम्हाला निष्ठावंत उमेदवाराचे काम करायचे आहे. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा असा साहेबांचा आदेश असून आम्ही आज पक्षाचे काम करायला तयार आहोत, असं उबाठा माथेरान शहर प्रमुख, कुलदीप जाधव यांनी सांगितले.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.