Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 28 ऑक्टोबर 2024: कर्क राशीने वेळेचा सदुपयोग करावा ! मकर राशीचे लोक करणार भरपूर शॉपिंग ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 28 October 2024 In Marathi : 28 ऑक्टोबर, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून करिअरच्या यश मिळेल. तर वृषभ राशीच्या योजना यशस्वी होणार असून टेन्शन कमी होईल. कर्क राशीच्या लोकांनी वेळेचा सदुपयोग करावा. तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा असून शैक्षणिक बाबतीत प्रगती होईल. मकर राशीची आर्थिक स्थिती उत्तम असून जोरदार शॉपिंग होणार आहे. तर मीन राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : सरकारी कामे मार्गी लागतील
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून करिअरच्या यश मिळेल. जमीन- मालमत्ता यासंदर्भात काही व्यवहार केले तर लाभदायक असतील. प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ असेल. ज्येष्ठांच्या आशिर्वादामुळे ऑफिसमध्ये लाभ होईल. व्यवसायात काही सरकारी कामे बाकी असतील तर मार्गी लागतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचाराने मार्गक्रमण करा.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : योजना यशस्वी, टेन्शन कमी
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून यश आणि आनंदाने भरलेला आहे. तुम्ही नोकरी आणि व्यवसायात जे काही योजना केल्या आहेत त्या पूर्ण होत आहेत असे तुम्हाला वाटेल. टेन्शन कमी होण्याची शक्यता आहे. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश आहे. जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : वाद-विवादापासून दूर राहा
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्हाला सावध रहावे लागेल. वाद-विवादापासून दूर राहा आणि कामावर लक्ष द्या. कोणत्याही कारणामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. तुमचे रखडलेले पेमेट आज मिळेल. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून मनावरचे ओझे कमी झाले आहे याची अनुभूती होईल. आर्थिक स्थिती उत्तम आहे.
कर्क आर्थिक राशिभविष्य : वेळेचा सदुपयोग करा
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत अडचणी घेवून येणार आहे. तसेच तुम्हाला सहकाऱ्यांची मदत फार मिळणार नाही. मेहनत केली तर फळ मिळेल तेसच वेळेचा सदुपयोग करा. भौतिक सुख साधनात वाढ होणार असून संध्याकाळपर्यंत तुमचे टेन्शन कमी होईल. आर्थिक स्थिती अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करा.
सिंह आर्थिक राशिभविष्य : करिअरमध्ये यश, मेहनतीचे फळ मिळेल
सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस करिअरमध्ये यश देणार आहे. तुम्ही काही नवीन गोष्टीत सहभाग घेणार आहात. आध्यात्मिक रुची वाढणार असून तीर्थयात्रेला जाण्याचा कार्यक्रम आखाल. आत्मविश्वासाने एखादे काम केले तर यश नक्की मिळते. तुम्हाला प्रत्येक कामात आज लाभ मिळेल पण मेहनत आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. काही कामे पूर्ण करताना पैसे खर्च करावे लागतील. नवीन योजनांवर काम करा, तुम्हाला लाभ होईल.
कन्या आर्थिक राशिभविष्य : कामात नशिबाची साथ
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला आहे. कष्टाचे फळ मिळेल त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आज कुटुंबातील सदस्य तुम्हाला कामात मदत करतील. तुमच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवा आणि मार्गक्रमण करा, यश तुम्हालाच मिळेल.
तुळ आर्थिक राशिभविष्य : नवीन कार्याच्या सुरुवातीसाठी दिवस उत्तम
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. शैक्षणिक बाबतीत तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात. नवीन कार्याची सुरुवात व्यवसायाच करायची असेल तर वेळ उत्तम आहे. तुमच्या विचारांना वास्तवात आणणार आहात त्यासाठी तुम्ही कठोर मेहनत कराल. वाहन चालवताना सावध राहा अपघाताची शक्यता आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : कामाचे कौतुक, खर्चात वाढ
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून करिअरमध्ये यश आहे. तुम्ही केलेले बदल फलदायी असतील त्यामुळे तुमचे कौतुक होईल. मात्र आज जास्त खर्च करणार आहात. मुलांनी केलेले काम तुमचा मानसन्मान वाढवेल. तुमच्या कामाचा जोश आणि यश पाहता विरोधक आज काहीच करू शकणार नाहीत. प्रियजनांच्या भेटीमुळे आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असेल.
धनू आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये सन्मान होणार
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून करिअरच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल. तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे त्याचा फायदा भविष्यात होईल. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमचा सन्मान होणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म करणार आहात. आज व्यवसायात उत्तम नफा आहे.
मकर आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थिती उत्तम, शॉपिंग जोरदार करणार
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही विचार केलेली कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक स्थिती उत्तम असून घरातल्या सगळ्यांना घेवून तुम्ही शॉपिंगला जाणार आहात. कोणी विचारले तरच त्याला सल्ला द्या अन्यथा देवू नका. तुमचे मन प्रसन्न राहणार आहे तसेच टेन्शन कमी होईल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : बँक बॅलन्स वाढणार
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून व्यवसायात तुमचे उत्पन्न वाढणार आहे. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. बँक बॅलन्स वाढणार आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नवे मित्र होतील तसेच मित्रांचे योग्य सहकार्य मिळेल. धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. व्यवसायात कामे मार्गी लागणार असून नफा कमविण्याच्या मार्गावर आहात.
मीन आर्थिक राशिभविष्य : सासरकडून धनलाभाचे योग
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. तुमची संपत्ती वाढणार असून सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. सासरकडून धनलाभाचे योग आहेत. नोकरीत तुमचे गुप्त शत्रू डोके वर काढतील त्यामुळे संध्याकाळी थोडा त्रास होवू शकतो. व्यवसायात शुभ लाभ आहे फक्त कामे नियोजनपूर्वक करा. मन प्रसन्न राहील. कामात अडचण आली तर गुरुजनांचे नामस्मरण करा.