Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एक दिवस राहिलेला असताना ठाकरेसेनेच्या उमेदवारानं माघार घेतली आहे. एमआयएमला फायदा होऊ नये म्हणून माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर मध्यमधून ठाकरेंनी तनवाणींची उमेदवारी जाहीर केली होती. ठाकरेसेनेच्या पहिल्याच उमेदवार यादीत त्यांचं नाव होतं. या मतदारसंघातून शिंदेसेनेनं विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा संधी दिली आहे. तर एमआयएमनं नासीर सिद्दीकी यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी निवडणूक रंगणार असल्याचं निश्चित झालं. पण तनवाणी यांनी दुपारच्या सुमारास पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची भूमिका जाहीर केली.
शिंदेंकडून घात, देवमाणूस म्हणत ठाकरेंची माफी; आमदार ढसाढसा रडला, आयुष्य संपवण्याच्या विचारात
तनवाणी यांनी अचानक माघार घेतल्यानं ठाकरेसेनेला धक्का बसला. पण त्यातून सावरत पक्षानं बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. बाळासाहेब थोरात हे छत्रपती संभाजीनगर मध्यचे शहरप्रमुख आहेत. ते माजी नगरसेवकदेखील आहेत. ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेत थोरात यांची उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी असताना मैदान सोडणाऱ्या तनवाणी यांना ठाकरेसेनेनं सर्व पदांमधून मुक्त केलं आहे. तशी माहिती दानवेंनी दिली आहे.
शिंदेंनी तिकीट कापलं, आमदारानं अन्नपाणी सोडलं; आत्महत्या करण्याच्या विचारात, दाव्यानं खळबळ
तनवाणींनी माघार घेताना काय म्हटलं?
२०१४ सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचं किशनचंद तनवाणी यांनी सांगितलं. ‘उद्धव ठाकरे साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती. पण २०१४ची पुनरावृत्ती नको म्हणून मी माघार घेतली. साहेबांना मी तशी विनंती केली आहे,’ असं तनवाणी यांनी सांगितलं.
ठाकरेंच्या उमेदवाराची अचानक माघार, तिथून आता बाळासाहेब थोरात लढणार; ठाकरेसेनेकडून तिकीट जाहीर
काय घडलेलं २०१४ मध्ये?
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी सेना, भाजपची युती तुटली. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यामुळे मतविभाजन झालं. त्याचा फटका सेना, भाजपच्या उमेदवारांना बसला. एमआयएमचे इम्तियाज जलील यामुळे जवळपास २० हजार मतांनी निवडून आले. २०१९ मध्ये मात्र शिवसेना, भाजपची युती होती. तेव्हा सेनेचे जैस्वाल जवळपास १४ हजार मतांनी विजयी झाले.