Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर आमदाराची अवस्था बिकट आहे. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची व्यथा मांडली.
शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी काल जाहीर झाली. त्यात पालघरमधून राजेंद्र गावित यांना तिकीट देण्यात आलं. विद्यमान आमदार असलेल्या वनगा यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्याचा मोठा मानसिक धक्का श्रीनिवास वनगा यांना बसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. श्रीनिवास वनगा आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. त्यांनी आयुष्याचं काही बरंवाईट केल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं आहे.
Supriya Sule: अजितदादांची रॅली, चिमुकली फोटोसाठी सुप्रिया सुळेंकडे आली; हाती गुलाबी झेंडा, ताईंनी काय केलं?
आम्ही तुम्हाला घरी बसवणार नाही. तुम्हाला पुन्हा तिकीट देऊ, असा शब्द शिंदेंनी श्रीनिवास यांना बंडात सहभागी होताना दिला होता. पण त्यांनी घात केला, असा गंभीर आरोप वनगा यांच्या पत्नीनं केला आहे. काल पक्षानं पालघरचा उमेदवार जाहीर केला. वनगा यांना तिकीट देण्यात आलं नाही. त्याचा माझ्या मिस्टरांना धक्का बसला. तेव्हापासून ते जेवलेले नाहीत. त्यांनी अन्नपाणी सोडलं आहे, अशी व्यथा वनगा यांच्या पत्नीनं मांडली.
शिंदेंनी तिकीट कापलं, आमदारानं अन्नपाणी सोडलं; आत्महत्या करण्याच्या विचारात, दाव्यानं खळबळ
श्रीनिवास वनगा कालपासून जेवलेले नाहीत. ते नीट बोलत नाहीत. वेड्यासारखं वागतात. आत्महत्या करणार असं म्हणतात. माझं आयुष्य संपून गेलं, असं वारंवार म्हणतात, असं वनगांच्या पत्नीनं सांगितलं. ‘उद्धव ठाकरे देवमाणूस होते. मी त्यांना देवच मानायचो. शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून मी मोठी चूक केली, असं श्रीनिवास वनगा वारंवार म्हणत आहेत,’ अशा शब्दांत पत्नीनं त्यांची अवस्था कथन केली.
Uddhav Thackeray: ठाकरेंना धक्का! उमेदवाराची माघार, निवडणूक लढण्यास नकार; म्हणतो, २०१४ मध्ये जे झालं ते…
एकनाथ शिंदेंनी सगळ्या आमदारांना पुन्हा तिकीट देणार असल्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी अन्य आमदारांचं पुनर्वसन केलं. मग एकट्या माझ्या मिस्टरांचं नेमकं काय चुकलं, असा प्रश्न वनगा यांच्या पत्नीनं माध्यमांशी संवाद साधताना विचारला. मुलगा कालपासून काहीच जेवत नाही. नीटसं बोलत नाही. आता आम्ही काय करायचं, कोणाकडे बघायचं, असे प्रश्न उपस्थित करत वनगा यांच्या आईनं हतबलता व्यक्त केली.