Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भोसरी विधासभेसाठी विलास लांडे ठरणार जायंट किलर, अजितदादांचा शिलेदार शरद पवारांचा प्रचार करणार

4

Edited byकरिश्मा भुर्के | Authored by प्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Oct 2024, 6:59 pm

Pune Bhosari Vidhan Sabha : भोसरी विधानसभा मतदारसंघात अजितदादांचे शिलेदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे भोसरीत महायुतीच्या उमेदवाराची कोंडी झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रशांत श्रीमंदीलकर, पुणे (पिंपरी) : विधासभेच्या प्रचाराचा जोर आता वाढू लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घडमोडी घडत असलेल्या भोसरी विधानसभेत आता भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्याविरोधात आता महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या सर्वात महत्वाची भूमिका ठरली ती अजित पवार गटाचे आजी आमदार विलास लांडे यांची. विलास लांडे हे महाविकास आघाडीच्या म्हणजे अजित गव्हाणे यांचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांची कोंडी झाली आहे.
Pune News : पुण्यात या मतदारसंघात अजित पवारांना धक्का, पक्षात पहिली बंडखोरी; ‘तो’ नेता अपक्ष लढणार
मागाच्या २०१९ च्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजप युती असताना भोसरी मतदारसंघ शिवसनेनेकडे गेला होता. तसंच २००९ आणि २०१४ च्या वेळी शिवसेनाकडून सुलभा उबाळे यांनी निवडणूक लढवली होती. यंदा महेश लांडगे यांना पुन्हा भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे महेश लांडगे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.
Ashok Chavan : भाजपच्या त्रासामुळे नाही, तर काँग्रेसच्या जाचामुळेच मी पक्ष बदलला! अशोक चव्हाण यांचा जाहीर सभेत गोप्यस्फोट
जागा वाटप होण्याअगोदरच शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या मतदार संघावर दावा ठोकला होता. शिवसेनेकडून रवी लांडगे हे निवडणूक लढावण्यासाठी इच्छुक होते. तसेच अजित गव्हाणे हे अगोदर अजितपवार यांच्याकडे होते. मग त्यांनी उमेदवारीसाठी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली.
मनसेची सहावी यादी जाहीर, कोणाला कुठून उमेदवारी? राज ठाकरेंकडून विधानसभेच्या रिंगणात आतापर्यंत ११७ शिलेदार

Pune News : भोसरी विधासभेसाठी विलास लांडे ठरणार जायंट किलर, अजितदादांचा शिलेदार शरद पवारांचा प्रचार करणार

मात्र असे असताना माजी आमदार विलास लांडे देखील भोसरीतून निवडणूक लढावण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. लोकसभेला अजितदादा पवारांकडून उमेदवारी मिळेल अशी इच्छा असताना त्यांना तिकीट मिळाले नव्हते. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे विलास लांडे आता शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार करणार आहेत, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. विलास लांडे यांच्या या भूमिकेमुळे मात्र महेश लांडगे यांची कोंडी होणार आहे. त्यामुळे भोसरी विधानसभेत नक्की कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.