Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Bandra East Vidhan Sabha : मनसेनेही वांद्रे पूर्वच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट देत मोठी खेळी खेळली आहे.
ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्व येथून आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी मैदानात उतरले आहेत. आता मनसेनेही इथल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट देत मोठी खेळी खेळली आहे.
Amit Thackeray Net worth : वडील राज ठाकरेंनाच ८४ लाखांचं कर्ज, दादरच्या स्टेट बँकेत १०७ खाती, अमित ठाकरेंची संपत्ती किती?
अमित ठाकरे यांच्या माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने महेश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकरही निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने तिथेही तिरंगी लढाई होणार आहे. अशातच राज ठाकरेंनीही शिवसेनेचा बालेकिल्ला आणि मातोश्रीचं अंगण असलेल्या वांद्रे पूर्व येथून ठाकरेंचे भाचे वरुण सरदेसाई यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार दिला आहे.
वांद्रे पूर्वचा इतिहास
२०१५ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेने बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना हरवून जवळपास २० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.
Gopal Shetty : कधी तावडेंना आणता कधी राणेंना; धर्मशाळा आहे का? साडेचार लाख मतांची लीड घेणाऱ्या गोपाळ शेट्टींचे बंड
कोण आहेत तृप्ती सावंत?
२०१९ मध्ये तत्कालीन आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. ठाकरेंनी विनंती करुनही माघार न घेतल्यामुळे तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली.
Trupti Sawant : मातोश्रीच्या अंगणात मनसेचा ट्विस्ट, नारायण राणेंना पाडणाऱ्या माजी आमदाराला तिकीट जाहीर
पुढे तृप्ती सावंत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यंदा वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मिळण्याची त्यांना आशा होती. मात्र संधी हुकल्याने अंतिम क्षणी त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेत या मतदारसंघात ट्विस्ट निर्माण केला आहे.