Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Solapur Shivsena Supporters Join Swarajya Party: सोलापुरात शिवसेनेत मोठा भूकंप आला आहे. भाजपच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दंड थोपडले आहेत.
हायलाइट्स:
- सोलापुरात महायुतीत मोठा भूकंप
- शिवसेनेचे पदाधिकारी स्वराज्य पक्षात
- भाजपला जागा सुटल्याने नाराजी
सोलापूर शहरातील जागावाटपामुळे कार्यकर्ते महायुतीतून बाहेर पडले
सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष होता. वास्तविक शहर मध्यची जागा ही शिवसेनेला सुटणार हे जवळपास निश्चित झाले होते. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे ती जागा भाजपच्या वाट्याला आली. शिवसेनेचे चारही जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहर मध्यच्या जागेवरून तटस्थ होते. मात्र, पक्ष श्रेष्ठींकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराज होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर निकटवर्तीय मानले जाणारे समर्थक जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, उमेश गायकवाड शहरप्रमुख मनोज शेजवाळ यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र स्वराज पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती खा. संभाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज पक्षात प्रवेश केला.
Shrinivas Vanga: गाडी, ड्रायव्हर सगळं इथेच, एकटेच पायी निघून गेले, १२ तासांपासून वनगांचा पत्ता नाही, पत्नीची चिंता वाढली
सोलापुरात महाराष्ट्र स्वराज पक्ष निवडणूकीच्या रिंगणात
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सोमवारी याबाबत पत्रकार परिषदेत पक्षप्रवेशा बद्दल सविस्तर माहिती दिली.
Shivsena Seat Sharing: सोलापुरात शिंदेसेनेला तडे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, भाजपविरोधात दंड थोपटले
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सोलापुरात महाराष्ट्र स्वराज पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शहर उत्तर अमोल शिंदे, शहर मध्य मनीष काळजे, दक्षिण मधून उमेश गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तिघांनाही एबी फॉर्म मिळाला असून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मनोज शेजवाळ यांनी माध्यमांना दिली.