Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election: नाशिकच्या नांदगावात महायुतीचे उमेदवार सुहास कांदे अडचणीत आलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना आता आणखी एका सुहास कांदेंची एन्ट्री झाली आहे.
नांदगाव मतदारसंघातून आमदार सुहास कांदेंच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एकानं अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्या उमेदवाराचं नाव सुहास कांदे आहे. यामागे समीर भुजबळच असल्याचा आरोप सुहास कांदेंनी केला. त्यामुळे मतदारसंघात तणाव निर्माण झाला. कांदे समर्थकांनी समीर भुजबळांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अपक्ष उभ्या राहिलेल्या सुहास कांदे यांच्या जीवाला असलेला धोका ओळखून पोलिसांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. अपक्ष उभ्या राहिलेल्या समीर भुजबळ यांच्याच कारमधून दुसऱ्या सुहास कांदेंची रवानगी करण्यात आली.
ही काही संगीतखुर्ची नाही! भाजपचा निष्ठावंत अपक्ष लढणार; शिंदेसेनेचा ‘इम्पोर्टेड’ नेता रडारवर
सुहास कांदे आणि भुजबळ यांचं वैर सर्वश्रृत आहे. समीर भुजबळांना नांदगावातून विधानसभा निवडणूक लढवायची होती. पण शिंदेसेनेचे सुहास कांदे विद्यमान आमदार असल्यानं नांदगावची जागा त्यांना सुटली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून नांदगावातून रिंगणात उतरले. त्यामुळे सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्या. त्यात आता आणखी एका सुहास कांदेंची एन्ट्री झाल्यानं आमदारांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
Ajit Pawar: केसानं गळा कापायचे धंदे! फडणवीसांनी ‘ती’ सही दाखवली! अजितदादांचे आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप
नांदगावात रायगड पॅटर्न!
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे असा थेट सामना झाला. अटीतटीच्या लढतीत गीते अवघ्या २ हजार ११० मतांनी निवडून आले. या निवडणुकीत सुनील तटकरे नावाचा एक अपक्ष उमेदवार होता. त्याला ९ हजार ८४९ मतं पडली. हीच मतं राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या पराभवाचं कारण ठरली होती.