Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प जबरदस्तीने केला जाणार नाही, बारसू रिफायनरीबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया

4

Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक ग्रामस्थांची भेट घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच रिफायनरीबाबत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात विधानसभा निवडणुकांचे रण तापले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राजापूर येथील रिफायनरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. रिफायनरीला असलेला स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन रिफायनरी संघर्ष समिती आणि बळीराज संघटनेचे नेते अशोक वालम यांनी शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सोमवारी रात्री उशिरा ही भेट झाली. राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधात असलेल्या स्थानिक ग्रामस्थांजवळ चर्चा करून आवश्यक असलेला निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या भेटीत दिली आहे. स्थानिक ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले असून येत्या दोन ते चार दिवसात ही भेट होईल, अशी महत्त्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सायंकाळी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांना आवश्यकता निर्णय माझ्याकडून घेतला जाईल अशी भूमिका यावेळी मुख्यमंत्र्यांनी भेटी दरम्यान घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांनी कालच्या चर्चेत स्पष्टपणे सांगितले आहे, की मी व उद्योगमंत्र्यांनी यापूर्वी अनेक वेळा आचारसंहितेआधी असे सांगितले आहे, की स्थानिकांचा विरोध डावलून एखादा प्रकल्प जबरदस्तीने तिथे केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडली.
Nagpur News : एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर, पण आई-वडिलांचा मोठा निर्णय, तिघांना नवजीवन
रिफायनरी संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी रिफायनरी करण्यामागचं कारण आम्हाला समजू शकेल का? अशी भूमिका यावेळी वालम यांनी मांडली आहे. केंद्रशासनाच्या माध्यमातून प्रदूषण विरहित कारखाने आणून स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका आहे. रिफायनरी प्रकल्पासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी थेट २३ नोव्हेंबरचा निकालच सांगितला, राज्यात भाजपच्या इतक्या जागा येतील; केला मोठा दावा

बारसू रिफायनरीचा जन्म उद्धव ठाकरेंनीच केला

बारसू रिफायनरी जन्माला कोणी घातली, हा देखील तिथल्या सगळ्या ग्रामस्थांनी विचार केला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर का बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले नसते, तर बारसू हा विषय झाला नसता, अशा शब्दात सामंत यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. नाणारचा विषय यापूर्वीच रद्द झाला होता. त्यामुळे मला तिथल्या लोकांना विनंती करायची आहे की गैरसमजला बळी न पडता ज्यांनी बारसू रिफायनरी जन्माला घातली तेच आता सांगताहेत की आम्ही रिफायनरी रद्द करणार आहोत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.
Palghar News : दादरा नगर हवेलीतून व्हॅन महाराष्ट्रात, पोलिसांची नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई; पालघरमध्ये काय घडलं?
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकारात्मक भूमिका पूर्वीदेखील होती, आता देखील आहे. जर स्थानिकांचा विरोध असेल, तर आम्ही दुसरा प्रदूषणविरहित प्रकल्प आणू, रिफायनरी हा देखील प्रदूषण विरहित ग्रीन प्रकल्प आहे, पण आम्ही तिथल्या स्थानिक लोकांबरोबर आहोत, असं सांगत पुन्हा एकदा भारत रिफायनरी संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Ratnagiri News : स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प जबरदस्तीने केला जाणार नाही, बारसू रिफायनरीबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया

ठाकरे सेनेचे युवा जिल्हाप्रमुख शिवसेनेत

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख परशुराम कदम यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. परशुराम कदम हे आमचे जुने सहकारी असून ते गेले अडीच वर्ष शरीराने अडीचवर्षे वेगळे होते, मात्र मनाने ते आमच्याबरोबर होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.