Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सरदेसाई चक्रव्यूहात, मातोश्रीच्या अंगणात २०१९ ची पुनरावृत्ती झाल्यास सिद्दीकींचा विजय पक्का?

12

Bandra East Vidhan Sabha : २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपच्या वादाचा फटका बसून काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं होतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मास्टरस्ट्रोकमुळे वांद्रे पूर्व येथे तिरंगी लढत होणार आहे. स्थानिक राजकीय इतिहास पाहता मनसेच्या उमेदवाराचा ठाकरे गटाला फटका बसू शकतो.

ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्व येथून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी मैदानात आहेत. ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्यासमोर वरळीत दुहेरी आव्हान आहे. तशीच परिस्थिती वांद्रे पूर्वेलाही आहे.

अमित ठाकरेंच्या माहीम विधानसभा मतदारसंघातील ‘डेब्यू मॅच’ला ठाकरे गटाने महेश सावंत यांना रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकरही निवडणूक लढण्यावर ठाम असल्यामुळे तिथलीही लढाई तिरंगी आहे. अशातच राज ठाकरेंनी शिवसेनेचा बालेकिल्ला आणि मातोश्रीचं अंगण असलेल्या वांद्रे पूर्वेला ठाकरेंचे भाचे वरुण सरदेसाईंविरुद्धही तगडा उमेदवार उतरवला आहे.

Varun Sardesai : आदित्यंप्रमाणे सरदेसाईही चक्रव्यूहात, मातोश्रीच्या अंगणातच दुहेरी आव्हान, २०१९ सारख्याच स्थितीमुळे सिद्दीकींचा विजय पक्का?

वांद्रे पूर्व मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?

२०१५ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळच्या अखंड शिवसेनेने बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. मात्र त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्वेषाने तृप्ती सावंत यांच्याविरोधात उतरले. परंतु जवळपास २० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.
Ravi Raja : दिवाळीत काँग्रेसमध्ये मोठा बॉम्ब फुटला, माजी विरोधीपक्ष नेत्याचा राजीनामा, भाजपात प्रवेश

२०१९ मध्ये काय झालं होतं?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेने पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या तत्कालीन आमदार तृप्ती प्रकाश (बाळा) सावंत यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी (दिवंगत) माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरली होती. त्यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता. शिवसेना आणि भाजपच्या वादाचा फटका बसून काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं होतं.
Jayshri Jadhav : काँग्रेसला डबल झटका, आधी रवी राजा, मग विद्यमान आमदारानेही पक्ष सोडला, शिवसेनेत जाहीर प्रवेश

त्याच वादाची पुनरावृत्ती होणार?

असाच काहीसा प्रकार यंदाही होऊ शकतो. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर झिशान यांच्याबाबत सहानुभूतीची लाट आहेच. याशिवाय विद्यमान आमदार असल्याने त्यांच्याकडे बळ आहे. तृप्ती सावंत पराभवाचा वचपा काढून आमदारकी परत मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. यावेळी त्यांना मनसेची ताकद आहे. मात्र सावंत आणि सरदेसाई यांच्यात मराठी मतांचं विभाजन होऊन मुस्लिम समाजाची निर्णायक मतं झिशान यांच्याकडे एकगठ्ठा वळल्यास त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. परंतु नाव ओळखीचे असले तरी ते नवीन पक्षात आहेत. विशेष म्हणजे तिन्ही उमेदवार आणि त्यांचे पक्ष तुल्यबळ असल्याने तिरंगी लढत चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.