Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ऐन दिवाळीत नाशिककरांचा विमान प्रवास महागला; तिकीट दरांत तिपटीने वाढ, जाणून घ्या नवे दर

9

Flight Ticket Fare Hike: नाशिकहून सुटणाऱ्या बहुतांश विमानांच्या भाडेदरात तिपटीने वाढ झाली आहे. विशेषतः एरवी पाच ते सहा हजारांपर्यंत असणारे नाशिक-गोवा विमानाचे भाडे तब्बल सोळा हजारांपलीकडे गेले आहे.

महाराष्ट्र टाइम्स
nashik airport

नाशिक : दिवाळी सुट्ट्यांमुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडत असून, त्यामुळे ऐन सणासुदीत विमानप्रवासाचे दर अक्षरशः गगनाला भिडल्याचे चित्र आहे. नाशिकहून सुटणाऱ्या बहुतांश विमानांच्या भाडेदरात तिपटीने वाढ झाली आहे. विशेषतः एरवी पाच ते सहा हजारांपर्यंत असणारे नाशिक-गोवा विमानाचे भाडे तब्बल सोळा हजारांपलीकडे गेले आहे.

डिसेंबर व जानेवारी हे दोन महिनेही पर्यटनासाठी उत्तम मानले जातात. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिने सर्वच प्रवासी भाड्याचे दर वाढलेले असतात. यंदा नाशिक विमानतळावरून देशांतर्गत आठ ठिकाणी सेवा सुरू असल्याने लोकांची विमानसेवेला पसंती लाभत आहे. या वर्षी दिवाळीत विधानसभा निवडणुकीची धामधूम असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या आहेत.

अनेकांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर पर्यटनाचे नियोजन आखल्याने त्यांना वाढीव दराचा फटका बसला आहे. विमानसेवेचे दर प्रवासाच्या तारखेवर अवलंबून असतात. सध्या ऐनवेळी पुढील आठवड्याच्या विमानाचे बुकिंग करावयाचे झाल्यास दर तिपटीने वाढलेले दिसत आहेत. एरवी चार ते सात हजारांदरम्यान असलेले दर दहा ते सोळा हजारांपर्यंत गेले आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे कल

नाशिककरांकडून यंदा केरळ, गोवा, राजस्थान, कर्नाटक या राज्यांसह आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. त्यात थायलंड, मलेशिया, बाली, श्रीलंका या जवळच्या देशांत जाण्याकडे अधिक कल दिसून येत आहे.

विधानसभेचा रणसंग्राम! राज्यात PM मोदींच्या सलग ८ दिवस सभा; तर अमित शहांच्या २०हून अधिक सभा, कसा असेल दौरा?
पुढील पंधरा दिवस विमानभाड्याचे दर दुप्पट वा दरवर्षीच घडते. त्यामुळे आधी बुकिंग करणे योग्य ठरते. यंदा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोक पर्यटनाला बाहेर पडू शकतात. त्यामुळे या वर्षी पर्यटनाचा मोसम लांबू शकतो. – सागर वाघचौरे, अध्यक्ष, तान
बंडखोरांची मनधरणी! बंड शमविण्यासाठी दोन्ही आघाड्यांतील पक्षांचे बैठकसत्र, अपक्ष कुणाला घाम फोडणार?
पाच नोव्हेंबरसाठी विमानप्रवासाचे दर
■ नाशिक ते नवी दिल्ली: ९,२०३ रुपये
■ नाशिक ते जयपूर : ११,४६३ रुपये
■ नाशिक ते हैदराबाद : १४,४५८ रुपये
■ नाशिक ते अहमदाबाद : ७,४६३ रुपये
■ नाशिक ते नागपूर : ८,३३२ रुपये
■ नाशिक ते गोवा : १६,६०५ रुपये
■ नाशिक ते इंदूर : ४,५३२ रुपये
■ नाशिक ते बेंगळुरू : ७,५१६ रुपये

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.