Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महायुती, मविआला धक्का देण्याच्या आधी राजू शेट्टींना कार्यकर्त्यांनी दिला जोरदार झटका; राजकारणाची दुकानदारी चालवण्यासाठी चळवळीचा वापर केल्याचा आरोप

12

Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी राजू शेट्टींवर घनाघाती टीका केली आहे. तसेच शेट्टींच्या कारभाराला वैतागून त्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे राज्यात माहविकास आघाडी आणि महायुतीला धक्का देण्याच्या विचारात असलेल्या राजू शेट्टी यांनाच धक्का बसला आहे.

Lipi

कोल्हापूर: राजू शेट्टी कधीही कोणालाही विश्वासात घेत नाहीत. कोणताही मोठा निर्णय घेताना प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना हे विचारत नाहीत. ते कोणालाही न विचारता मनमानी पद्धतीने निर्णय घेतात. यामुळे कार्यकर्ते दुखावले जात असून यामुळे चळवळ संपत चाललीय आणि याला सर्वस्वी जबाबदार स्वतः राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टींना राजकारणाची दुकानदारी चालवायचीय हाच त्यांचा खरा चेहरा असून यासाठी ते चळवळीचा वापर करत आहेत. अशी घनाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि राजू शेट्टींच्या कारभाराला वैतागून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलय त्यास कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या साठी लढणारी राज्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखली जाते. स्वाभिमानी च्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी अनेक मोठमोठे यशस्वी आंदोलन केली अगदी लोकसभा आणि विधानसभा देखील गाजवली. मात्र गेल्या काही वर्षात या शेतकऱ्यांच्या चळवळीला राजू शेट्टी यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांचे अनेक शिलेदार दूर होत आहेत. सुरुवातीला सदाभाऊ खोत, गेल्या काही महिन्यांपूर्वी रविकांत तुपकर आणि आता कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी देखील स्वाभिमानीला सोडचिट्टी दिली आहे.

एका रात्रीत काय खेळ झाला

राज्यात एका बाजूला तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून मतदारांना नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राजू शेट्टी यांचा होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांची संघटना फुटत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाला यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून मोर्चे बांधलेला सुरुवात केली. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत वैभव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र एका रात्रीत त्यांची उमेदवारी रद्द करत ठाकरे गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केलेले माजी आमदार सुजित मिणचेकर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे गेल्या 19 ते 20 वर्षांपासून केलेली चळवळ आणि त्याग एका रात्रीत घालवत माझी उमेदवारी रद्द का केली असं एका रात्रीत काय खेळ झाला की सात ते आठ तासात माझी उमेदवारी रद्द केली असा सवाल वैभव कांबळे यांनी राजू शेट्टी यांना विचारला आहे.
Rohit Bal Died: कोणत्या आजारामुळे रोहित बल यांचे निधन झाले? थेट हृदय कमकूवत होते आणि…

राजू शेट्टी कोणालाही न विचारता मनमानी पद्धतीने निर्णय घेतात

तसेच राजू शेट्टी यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली असून सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही स्वतःच्या पदाचे पैसे घालून स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येक बांधावर पोहोचली. प्रामाणिकपणे कार्यकर्ते संघटना वाढवत असताना या कार्यकर्त्यांचा वापर राजू शेट्टी यांनी वैयक्तिक राजकारणासाठी सुरू केला. राजू शेट्टी कधीही कोणालाही विश्वासात घेत नाहीत. हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील इतका मोठा निर्णय होत असताना त्यांनी प्रदेशाध्यक्षांना आणि आम्हाला एकदाही विचारलं नाही. ते कोणालाही न विचारता मनमानी पद्धतीने निर्णय घेतात आणि यामुळे कार्यकर्ते दुखावले जात आहेत. यामुळे उभारण्यात आलेली ही चळवळ संपत चालली असून याला सर्वस्व जबाबदार स्वतः राजू शेट्टी आहेत असे वैभव कांबळे म्हणाले आहेत.
बांगलादेशमधून आली मोठी बातमी! यूनुस सरकारचा खरा चेहरा समोर आला, हिंदू धर्मगुरूंवर देशद्रोहाचा गुन्हा
राजू शेट्टींना राजकारणाची दुकानदारी चालवायचीय

ते स्वतः निवडणुकीला उभे राहिले की चळवळ टिकली पाहिजे अशी टॅगलाईन लावतात आणि गाण वाजवल जात. मात्र जेव्हा कार्यकर्ता विधानसभेला, जिल्हा परिषदेला उभारतो त्यावेळेस चळवळ विकली पाहिजे असे ते म्हणतात. राजू शेट्टींना राजकारणाची दुकानदारी चालवायची आहे आणि यासाठी ते चळवळीचा वापर करत आहेत. हाच त्यांचा खरा चेहरा आहे. प्रामाणिकपणे चळवळ चालवणाऱ्या नेत्याला शेतकऱ्यांनी वर्गणी देऊन डोक्यावर घेतल, विधानसभेत लोकसभेत पाठवल, मात्र आता शेतकऱ्यांना हा आपला भाबडा आशावाद आहे हे कळल्यानंतर शेतकऱ्यांनी राजू शेट्टीकडे दुर्लक्ष केले आहेत यामुळे त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झाल.अशी जहरी टीका वैभव कांबळे यांनी राजू शेट्टी यांच्यावर केल आहे.

चळवळ विकायच काम राजू शेट्टी करत आहेत

तर तिसरी आघाडी तयार करताना आणि तयार झाल्यानंतर ही त्यांनी कधीही प्रदेशाध्यक्षांना घेऊन एकाही बैठकीला गेले नाहीत. चळवळ टिकवण्यासाठी साहेबांच प्रयत्न सुरू आहेत असे आम्हाला वाटायचे म्हणून आम्ही ही दुर्लक्ष करायचो. मात्र गेल्या चार आठ दिवसांमध्ये घडत असलेल्या घडामोडी पाहता चळवळ विकायच काम राजू शेट्टी करत आहेत.यामुळे मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्त करत असल्याचा वैभव कांबळेनी म्हटलय यामुळे आगामी काळात राजू शेट्टी संघटना आणि चळवळ वाचवण्यासाठी आपले मनमानी कारभार बंद करणार का? आणि चळवळीचे कार्यकर्त्यांना संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.