Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 2 नोव्हेंबर 2024: उत्साहात कामे मार्गी लागणार ! प्रतिस्पर्ध्यांसोबत काटे की टक्कर ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 2 November 2024 : 2 नोव्हेंबर, शनिवार आज बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजन तसेच कार्तिक महिन्याची सुरुवात होत आहे. या शुभ दिनी सर्व मूलांकावर भगवान विष्णु यांचा आशिर्वाद असेल तसेच तुमची सर्व कामे मार्गी लागतील. मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. आज प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागेल. मूलांक 2 च्या लोकांनी आर्थिक व्यवहार तर मूलांक 4 च्या जातकांनी गुंतवणुकिचा विचार पुढे ढकला. मूलांक 7 साठी थोडा कठिण काळ असून प्रतिस्पर्ध्यांसोबत काटे की टक्कर असणार आहे. मूलांक 9 च्या लोकांनी तब्येतीची खास काळजी घ्यावी अन्यथा शारिरीक इजा होण्याची शक्यता आहे. आज मूलांक 2 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – आर्थिक स्थितीबद्दल टेन्शन वाढेल
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. आज प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागेल. आर्थिक स्थिती ओके असून तुम्ही पैशांसंर्दभात काळजीत असाल. तुमचे येणार पैसे थांबणार आहेत त्यामुळे तुमचे टेन्शन वाढणार आहे. तुम्हाला तब्येतीची खास काळजी घ्यायला हवी कारण ताण तणावामुळे तब्येत बिघडू शकते. कुटुंबासाठी आजचा दिवस सामान्य असून वडिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. जोडदारासोबत दिवस ठिक असेल.
मूलांक 2 – आर्थिक व्यवहार पुढे ढकला
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य असून आज तुमचा स्वभाव चिडचिडा होणार आहे. आर्थिक बाबतीत दिवस फारसा ठिक नाही. आज केलेले आर्थिक व्यवहार सफल होणार नाहीत त्यामुळे आर्थिक व्यवहार करू नये. आज मानसिक ताण वाढेल. ऑफिस किंवा व्यवसाय स्थळी सहकाऱ्यांसोबत वाद होवू शकतो. जोडीदारासोबत प्रेमाने वागा. तुम्हाला प्रत्येक कामात त्यांची उत्तम साथ मिळेल.
मूलांक 3 – जोश उत्साहात सगळी कामे पूर्ण कराल
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही चतुराईने आज सगळे काम पूर्ण कराल. तसेच कामात एक जोश असेल. धनसंपत्तीच्या बाबतीत दिवस अनुकूल असून अचानक धन प्राप्ती होवू शकते. तुमची हरवेलेली मौल्यवान वस्तू आज सापडणार आहे. नोकरदारांसाठी दिवस चांगला असून ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे. कुटुंबासोबत परदेशात जाण्याचे योग आहेत.
मूलांक 4 – गुंतवणुकिचा विचार पुढे ढकला
मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमचे मानसिक टेन्शन वाढणार आहे. तुमचा राग काही कारणामुळे वाढू शकतो. त्यामुळे कामे करताना तुमची चिडचिड होवू शकते. आर्थिक स्थिती फारशी ठिक नसेल त्यामुळे गुंतवणुकिचा विचार करू नये. कौटुंबिक बाबतीत दिवस सामान्य असून तुमच्या चिडचिड्या स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. जोडीदारासोबत मधुर संबध ठेवावेत.
मूलांक 5 – सर्व कामे मार्गी लागतील
मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक असून तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुम्ही विचार केलेली सर्व कामे मार्गी लागतील. तुम्ही जर काही गुंतवणूक केली असेल तर त्याचा लाभ होणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने दिवस व्यतीत करणार आहात. तुम्हाला सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळेल, त्यामुळे तुमच्या कामात जोश उत्साह असेल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे.
मूलांक 6 – पैशांची समस्या, व्यापारात अडचणींचा सामना
मूलांक 6 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही विचार केलेली कामे पूर्ण होणार असून तुम्ही जे काही ठरवलं आहे ते मार्गी लागेल. आर्थिक बाबतीत दिवस उदास असेल. पैशांची समस्या जाणवेल तसेच व्यापारात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगला व्यवहार ठेवा, ज्यामुळे घरात शांतता आणि समाधान नांदू शकेल. जोडीदारासोबत दिवस ठिक असून तुमचे संबंध अधिक दृढ होतील.
मूलांक 7 – प्रतिस्पर्ध्यांसोबत काटे की टक्कर
मूलांक 7 साठी आजचा दिवस सामान्य असून तुमच्यातील अहंकाराची भावना जागृत होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांसोबत काटे की टक्कर असेल. आज अपशब्द किंवा रागाने बोलून तुम्ही पूर्ण होत असलेल्या कामात अडथळा निर्माण करणार आहात. धन संपत्तीच्या बाबतीत दिवस अनुकूल असून पैशांशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील. कुटुंब आणि जोडीदारासोबत दिवस आनंदात व्यतीत करणार आहात.
मूलांक 8 – रागावर नियंत्रण हवे
मूलांक 8 साठी आजचा दिवस सामान्य असून कार्यक्षेत्रात तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुमची अस्वस्थता खूप वाढेल. पण तुम्ही शांत राहा आणि राग व्यक्त करताना सौम्य शब्दांचा वापर करा, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. धन संपत्तीच्या बाबतीत दिवस सामान्य असून पैसे मिळवताना येणाऱ्या अडचणी कमी होतील. कुटुंबात कोणासोबत वाद-विवाद होऊ शकतो, तुमच्या रागावर नियंत्रण असू दे. जोडीदारासोबत संबंध उत्तम असतील.
मूलांक 9 – शारिरीक इजा होण्याची शक्यता
मूलांक 9 साठी आजचा दिवस सामान्य असून तुम्हाला तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल. शारिरीक इजा होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. धन संपत्तीच्या बाबतीत दिवस चांगला असून धनलाभाचे योग आहेत. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये दाखवलेली रणनीती सफल होणार आहे. नवे प्रोजेक्ट मिळणार असून कामांचे नियोजन तुम्हाला सफलता देणार आहे.