Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मातोश्रीवरुन मेसेज, अरविंद सावंतांनी ‘माल’ संदर्भातील वाद संपवला, पीसी संपताच ताडकन उठले

5

Arvind Sawant apology over Maal Remark : कुठल्याही महिलेच्या भावना दुखवाव्यात किंवा कुठल्याही भगिनीचा अवमान करावा, असं मी आयुष्यात कधी केलं नाही. पण भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं अरविंद सावंत म्हणाले

Arvind Sawant : मातोश्रीवरुन मेसेज, अरविंद सावंतांनी ‘माल’ संदर्भातील वाद तातडीने संपवला, पीसी संपताच ताडकन उठले

मुंबई : शायना एनसी संदर्भात बोलताना ‘माल’ या शब्दाचा उल्लेख करण्यावरुन अडचणीत आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या शायना एनसी यांनी तक्रार नोंदवल्यानंतर ‘मातोश्री’वरुन सावंत यांना हे प्रकरण संपवण्याचा खास मेसेज आला होता. त्यानंतर अरविंद सावंत यांनी तातडीने माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. महिलांविषयी झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांची यादीच अरविंद सावंत यांनी वाचून दाखवली.

अरविंद सावंत यांची दिलगिरी

शूर्पणखा कोण म्हणालं होतं, हे बघा, सोनिया गांधी यांच्याविषयी जर्सी गाय कोण म्हणालं होतं, हे आठवून बघा, किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख जो आशिष शेलार यांनी केला, त्याच्याविषयी कुठली तक्रार झाली? एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बदलापूर प्रकरणी एका महिलेविषयी वक्तव्य केलं, त्यात कोणावर गुन्हे दाखल झाले? संजय राठोड यांच्यावर आरोप असताना तो तुमच्यासोबत आहे, राम कदम यांच्यावर काय कारवाई झाली, गुलाबराव पाटील हेमा मालिनी संदर्भात काय बोलले? अशी महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्यांची यादीच अरविंद सावंत यांनी वाचून दाखवली.
Shaina NC: राजपूत वडील, मुस्लीम आई, मारवाडी बालमित्राशी विवाह; शायना यांच्या नावापुढील ‘एनसी’चा अर्थ काय?
या सर्वांनी जर महिलांचा सन्मान राखला असेल, तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. कुठल्याही महिलेच्या भावना दुखवाव्यात किंवा कुठल्याही भगिनीचा अवमान करावा, असं मी आयुष्यात कधी केलं नाही. करत नाही, करणार नाही. पण भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत अरविंद सावंत ताडकन खुर्चीतून उठले.
Eknath Shinde : राज ठाकरेंना रणनीती विचारलेली, त्यांनी परस्पर उमेदवारच दिला, माहीममध्ये माघार नाही, शिंदेंची स्पष्टोक्ती

अरविंद सावंत काय म्हणाले होते?

‘त्यांची अवस्था पाहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात गेल्या. पण, इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो,’ असे विधान अरविंद सावंत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. त्यानंतर अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.