Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sada Sarvankar: महायुतीच्या अधिकृत उमेदवारानं माघार घ्यावी यासाठी माहीममध्ये चक्क भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. माहीममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित रिंगणात आहेत.
दादर माहीममधून सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. माहीमची जागा आमच्याकडे असती, तर अमित ठाकरेंना अवघ्या एका मिनिटात पाठिंबा जाहीर केला असता, असं बावनकुळे म्हणाले आहेत. सध्या चेंडू मुख्यमंत्री शिंदेंच्या कोर्टात आहेत. ते सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा बावनकुळेंनी व्यक्त केली.
तो कार्यकर्ताच नाही! शहांचा ‘तो’ किस्सा भाजप नेतेच विसरले; समजूत काढताना फडणवीसांची दमछाक
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरवणकर यांच्याशी दोनवेळा चर्चा केली. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण ते माघार घेण्यास तयार नाहीत. सरवणकर विद्यमान आमदार आहेत. ते मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे महायुतीकडून त्यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आली. पण ती ऑफर सरवणकर यांनी नाकारली.
Manoj Jarange Patil: खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग…
महायुतीत पुन्हा सत्तेत आल्यावर विधान परिषदेचं सदस्यत्व आणि मंत्रिपद देऊ, अशी नवी ऑफर आता सरवणकर यांना दिली गेल्याची माहिती द न्य इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. पण या ऑफरबद्दल सरवणकर यांनी अद्याप तरी निर्णय घेतलेला नसल्याचं वृत्तात नमूद केलं आहे. त्यामुळे माहींंमध्ये काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
महायुतीकडून सरवणकरांना नवी ऑफर, विचार सुरु; उमेदवारी अर्ज माघारी घेणार?
सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी शिंदेंचे फारसे प्रयत्न सुरु नाहीत. सरवणकर यांच्या माघारीमुळे आमदारांचा आकडा एकनं कमी होईल, असं शिदेंना वाटतं. पुढील मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं मनसे प्रमुख राज ठाकरे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते. ते विधान शिंदेंना रुचलेलं नाही. शिंदे मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीत. तशी त्यांची इच्छा नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा आहे, अशी माहिती महायुतीमधील एका बड्या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.