Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ऐन निवडणुकीत धक्कादायक प्रकार, बसपच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक; महाराष्ट्रात खळबळ

6

Buldhana Shankar Chavan Attack: बुलढाण्यात बुलढाण्यात एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

हायलाइट्स:

  • निवडणूक आणि पुन्हा एकदा वादाची ठिणगी
  • बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला
  • बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ
Lipi
शंकर चव्हाण हल्ला

अमोल सराफ, बुलढाणा : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि त्यातच आरोप प्रत्यारोप एकमेकावर चिखलफेक सुरूअसताना जीवघेणे हल्ले हे महाराष्ट्रात आता घडायला लागले का? सुसंस्कृत महाराष्ट्र काय आदर्श ठेवत होता आणि कुठे नेऊन ठेवला आहे. महाराष्ट्र माझा अशी विचारण्याची वेळ आज बुलढाण्यातील या घटनेनं आली आहे.बुलढाण्यात बुलढाण्यात एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. वकील शंकर चव्हाण यांच्यावर ४० ते ५० अज्ञात यांनी जीवघेणा हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या हल्ल्यात शंकर चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Arvind Sawant : मातोश्रीवरुन मेसेज, अरविंद सावंतांनी ‘माल’ संदर्भातील वाद तातडीने संपवला, पीसी संपताच ताडकन उठले

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर चव्हाण हे बहुजन समाज पार्टीचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभेचे अधिकृत उमेदवार आहेत. काल शुक्रवारी रात्री शंकर चव्हाण हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर फाटा परिसरातील त्यांच्या हॉटेलवर लक्ष्मीपूजन त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बसले होते. त्याचवेळी ४० ते ५० जणांच्या अनोळखी टोळक्याने त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. शंकर चव्हाण यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळ फरार झाले. चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यांनी शंकर चव्हाण यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात भरती केले. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. चिखली पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.