Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने आमदार बंडखोरी करत आहेत. मोठ्या पक्षांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र एका विद्यमान आमदाराने आपल्या बायकोसाठी उमेदवारी मागे घेतली आहे. कोण आहेत ते आमदार जाणून घ्या.
२०१९ च्या निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा मतदार संघातून शेकाप पक्षाकडून निवडणूक लढवली होती. एक लाखाहुन अधिक मतं घेऊन त्यांनी विजय मिळवला. श्यामसुंदर शिंदे हे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे दाजी आहेत. यंदा लोहा मतदार संघातून निवडणूक आपण लढणार अशी घोषणा आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी केली होती. मागील सहा महिण्यापासून त्यांनी मतदार संघात तयारी देखील सुरु केली. पण जागा वाटपा दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. एकनाथ पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. शेकाप पक्षाने देखील आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यांची पत्नी आशा शिंदे या दोघांना एबी फॉर्म दिले. दोघांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोघांपैकी उमेदवार कोण असणार शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा देखील सुरु होती. अखेर आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. आपल्या पत्नी खातर आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
लोहा मतदार संघ हा जिल्ह्यातील दुसरा हायहोल्टेज मतदार संघ आहे. भोकर प्रमाणे लोहा मतदार संघाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा मतदार संघातून विधानसभा निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहेत. लोहा मतदार संघ हा महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला ही जागा सुटल्याने चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे या शेकापकडून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून एकनाथ पवार, वंचितकडून शिवा नरंगले, प्रा. मनोहर धोंडे यांच्या सह अनेकजण निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या मतदार संघातून अनेकांनी उमेदवारी दाखल केली असली तरी, खरी लढत माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आशा शिंदे या बहीण भावामध्ये होणार आहे. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.