Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 4 नोव्हेंबर 2024: मिथुन राशीच्या लोकांची कामे पूर्ण होणार ! धनू कर्जमुक्त होणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य

11

Finance Horoscope Today 4 November 2024 In Marathi : 4 नोव्हेंबर, सोमवार, आठवड्याची सुरूवात होते आहे. आज वेशी योग, सर्वार्थ सिद्धी योग यांसह अनेक प्रभावी योग तयार होत आहेत. त्याचा लाभ मेष, मकर, मीन आणि इतर 5 राशींसाठी हा दिवस फलदायी आणि यश देणारा आहे. सोमवार शंभोमहादेव आणि चंद्र देव यांना समर्पित आहे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 4 नोव्हेंबर 2024: मिथुन राशीच्या लोकांची कामे पूर्ण होणार ! धनू कर्जमुक्त होणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य

Aaj che Aarthik Rashi Bhavishya 4 November 2024 : 4 नोव्हेंबर, सोमवार, चंद्र वृश्चिक राशीत संचार करणारा आहे. तसेच आज कार्तिक महिना, शुक्ल पक्षातील तृतीय तिथी आहे. आज वेशी योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि अनुराधा नक्षत्र असा शुभ योग जुळून आल्यामुळे मेष, मकर, मीन आणि इतर 5 राशींच्या लोकांना आर्थिक, करिअरच्या बाबतीत लाभ आणि प्रगती आहे. व्यवसायात नवे निर्णय फलदायी असतील तसेच ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढतील आणि कौतुक होईल. चला तर पाहूया करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींची आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : कामे मार्गी लागतील

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाने भरलेला असेल तसेच इतरांकडून तुम्हाला प्रत्येक कामात मदत मिळेल, तुमची कामे पटापट मार्गी लागतील. समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकणे कधीकधी लाभदायक असू शकते. व्यवसाय आणि ऑफिसमध्ये टीम वर्कमुळे समस्येवर पटकन मार्ग सापडेल. कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहेत.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : करियरमध्ये प्रगतीचे योग

वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात लाभ करियरमध्ये प्रगतीचे योग आहेत. काही तरी नवीन गोष्ट करण्याचा विचार तुम्ही कराल. घरात वस्तू येतील, तुम्ही जोरदार खरेदी करणार आहात.घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत वादविवाद करू नका. सकारात्मक विचार करा आणि रागावर नियंत्रण ठेवाय

मिथुन आर्थिक राशिभविष्य : जे काम हाती घ्याल ते पूर्ण कराल

मिथुन राशीच्या लोकांसाठी करियरमध्ये प्रगती असून तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला लाभ आहे. तुमच्या मान-सन्मात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यवसायात भागीदारांकडून पूर्ण मदत मिळेल. जी कामे थांबलेली आहेत ती पटापटा मार्गी लागतील. कर्ज कमी होईल आणि घरातल्यांचे ही कामात सहकार्य मिळेल.

कर्क आर्थिक राशिभविष्य : थांबलेले पेमेंट अचानक मिळेल

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा करियरमध्ये यश देणार आहे. संपत्ती मिळाल्याने मन प्रसन्न असेल तसेच थांबलेले पेमेंट देखील अचानक मिळेल. धन संपत्ती वाढल्यामुळे तुम्ही गुंतवणुकिचा विचार करु शकता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. रात्री प्रियजनांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात.

सिंह आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये अधिकारात वाढ

सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस करियरमध्ये यश आणि व्यवसायात प्रगतीचा योग आहे. ऑफिसमध्ये तुमच्याकडे जास्त अधिकार दिले जावू शकतात. क्रिएटीव्ह कामात यश मिळेल. धनसंपत्ती वाढ होणार असून व्यवसायात अधिक लाभ होण्यासाठी अनेक मार्ग खुले होतील.

कन्या आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये अचानक बदल, तुमचा फायदा

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करियरमध्ये यश आणि तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. काही कारणांमुळे वादाचा सामना करावा लागू शकतो आणि वातावरण खराब होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक विचार करा. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काही अचानक बदल होतील, त्याचा फायदा तुम्हाला होईल.

तुळ आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात बदल करावेत

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून करियरमध्ये लाभ आणि व्यवसायात प्रगती होईल. तुम्हाला व्यवसायात बदल करावे लागू शकतात. नवीन काम करताना कायदेशीर आणि तांत्रिक पैलूंवर गंभीरपणे विचार करूनच काही निर्णय घ्या. घरातील जुनी आणि राहिलेली कामे पूर्ण करून तुम्हाला लाभ मिळेल. सकारात्मक विचार मन प्रसन्न करतील.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद आणि प्रगतीने भरलेला आहे. व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यायला हवा. मित्रमैत्रिणिंसोबत उत्तम वेळ घालवणार आहात. तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडाल त्यामुळे कौतुक होणारा आहे. धनसंपत्तीत वाढ असून आर्थिक स्थिती उत्तम असेल.

धनू आर्थिक राशिभविष्य : कर्ज चुकते होणार

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित फलदायी आहे. तुमचे जुने कर्ज चुकते होणार आहे त्यामुळे मनावरचे ओझे कमी होईल. काही नवीन विचार करू शकता. कार्यक्षेत्रात तुमच्या सुचनांचा आदर केला जाणार आहे. घरगुती सामानाची खरेदी करणार. पैसे खर्च करताना विचार करा. कुटुंबासोबत संध्याकाळ मसत् व्यतीत होणार आहे.

मकर आर्थिक राशिभविष्य : कोणी उधार मागितले तर देऊ नका

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी होणार आहात. मंगलकार्यात कुटुंबासह सहभागी होणार आहात. जुने मित्र भेटल्यामुळे मन आनंदी असेल. कोणी उधार मागितले तर देऊ नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. आर्थिक स्थिती ठिक असेल.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही राजकारणात असाल तर तुमची उत्तम प्रगती होणार आहे. नशिबाची साथ प्रत्येक कामात असेल. स्पर्धेत तुमचे प्रतिस्पर्धी मागे राहतील. तुमची यशो किर्ती आज वाढेल. चांगल्या कामात खर्च करणार आहात तसेत दानधर्म होणार आहे. बँक बॅलेन्स वाढल्यामुळे खूष असाल.

मीन आर्थिक राशिभविष्य : नोकरीत मूड खराब होण्याची शक्यता

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. आज घरची मंडळी आणि जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील. नोकरीत विरोधक बॉसकडे तुमची चुगली करू शकतात तेव्हा सावध राहा आणि तुमचा मूड खराब होणार नाही असे पाहा. आपल्या गुरूजनांप्रती नेहमी आदर ठेवा, त्यांचा आशिर्वाद तुम्हाला कामात उत्तम यश देईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.