Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Aukshan: प्रसंगाचे मांगल्य वाढवी औक्षण ! औक्षणाची दिशा, साहित्य जाणून घ्या

9

Aukshan Info in marathi: भारतीय संस्कृतीत संस्कारांना खूप महत्त्व आहे. फक्त सण वार नाही तर रोजच्या जीवनात संस्कांराचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर आहे. या संस्कारातील एक संस्कार म्हणजे औक्षण करणे. आपल्याकडे शुभप्रसंगी, सणवारा औक्षण केले जाते. या औक्षणाचे महत्त्व, परिणाम काय होतात ते जाणून घेवूया या लेखात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Aukshan: प्रसंगाचे मांगल्य वाढवी औक्षण ! औक्षणाची दिशा, साहित्य जाणून घ्या

Aukshan Disha Sahitya:

औक्षण हा शुभ संस्कार असून, हिंदु धर्मात शुभप्रसंगी औक्षण करतात. औक्षण करताना काही खास साहित्य लागते तसेत त्यांची मांडणीदेखील शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. या प्रत्येक गोष्टीमागे एक मतीतार्थ दडलेला आहे. औक्षण करताना दिशा देखील योग्य असायली हवी. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळेल या लेखातून.
वाढदिवसाच्या प्रसंगी किंवा परीक्षेत चांगले मार्क मिळाले की आई आवर्जून औक्षण करते. गावी गेलात की आजी पायावर पाणी घालते आणि औक्षण करुन सगळ्यांना घरात घेते. औक्षण एक संस्कार तर आहेच त्याचबरोबर औक्षणसोबत मंगल भावना आहेत. आपल्या धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे. मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत जे सोळा संस्कार केले जातात त्या प्रत्येकामागे शास्त्र आहे. शास्त्रात सांगितले आहे, की कोणत्याही उत्तम क्षणांच्या आगमनाचे स्वागत करताना, विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या अध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दीपज्योती क्रियाशील करतात. म्हणूनच औक्षण केले जाते.

देवतांना शरण जाऊन अध्यात्मिक उन्नती

‘औक्षण’ म्हणजे ज्योतीच्या साहाय्याने कार्यरत झालेल्या ब्रह्मांडामधील देवतांच्या लहरी पृथ्वीवर येण्याच्या क्षणाचे स्वागत करणे. तसेच तो क्षण टिपून त्याच वेळी त्या लहरींना शरण जाणे असेही म्हणतात. औक्षण करवून घेणार्‍या जिवाच्या देहाभोवती गतीमान संरक्षक-कवच निर्माण होते. औक्षण करतांना देवतांना शरण जाऊन स्वतःची अध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रार्थना केल्यानेच अपेक्षित फल प्राप्ती होते आणि खर्‍या अर्थाने औक्षण कर्माचे उदि्दष्ट साध्य होते म्हणजेच औक्षणाच्या माध्यमातून देवतांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते.

देवांचा आशीर्वाद मिळवण्यास मदत

औक्षण करताना हळद-कुंकू, तांदूळ, निरंजन, अंगठी किंवा दागिना, सुपारी ठेवली जाते. देवासमोर किंवा ताम्हणात ठेवून प्रज्वलित केलेला दिवा हा धरणीवरील दिव्य आणि तेजस्वी स्वागताचे प्रतिक आहे. म्हणून औक्षण करताना निरंजन वापरलं जातं. औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात. व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण करत असतात. म्हणजेच अग्नीतत्वात या वाईट नकारात्मक शक्ती जाळून टाकायचं काम या औक्षणासाठी लावलेले निरांजन करते. देवांचा आशीर्वाद मिळवण्यास हे औक्षण साहाय्य करते. म्हणजेच कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून, सात्विक भाव ठेवून औक्षण केल्याने, देवांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते. औक्षण करत असताना व्यक्तीला स्वतंत्रपणे अध्यात्मिक विकास आणि सर्वदा शरणागती पत्करल्यामुळे पाहिजे ते यश मिळून, देवांचा आशीर्वाद सहज मिळतो.

औक्षण करताना दिशा महत्त्वाची

औक्षण करीत असताना देवासमोर पाट अथवा चौरंग मांडून, सभोवार रांगोळी घालून त्यावर व्यक्तीला बसविले जाते. लग्न, मुंजीत औक्षणाचा सोहळा मंडपात केला जातो. औक्षण करत असताना दिशांचेही भान ठेवावे लागते. पूर्व पश्चिम बसवूनच औक्षण करावे असे सांगितले जाते. उंबरठ्यावर औक्षण केले जात नाही, ते घरातच केले जाते.

अंगठी आणि सुपारी का ओवाळतात?

औक्षण करताना अंगठी आणि सुपारी ओवाळली जाते त्यामागे एक शास्त्र आहे. औक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जावून प्रार्थना केल्यामुळे सर्व घटक सात्वीक लहरींनी प्रभावीत होतात. हातात धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे त्या आकर्षिल्या जातात. अंगठीने ओवाळतांना अंगठीकडून प्रक्षेपित होणार्‍या सात्वीक लहरींचे रूपांतर रजोलहरींमध्ये होते आणि या लहरींचे दुसर्‍या जिवाच्या सभोवती संरक्षक कवच तयार होते. त्यानंतर सात्वीक लहरींनी प्रभावीत झालेली अंगठी ताम्हणाला टेकवली असता तिच्यातील लहरी तांब्याच्या ताम्हणात आकर्षिल्या जातात. ताम्हणातून या लहरी औक्षण करणार्‍या जिवाच्या शरीरात त्याच्या हातांद्वारे संक्रमित केल्या जातात. त्यामुळे औक्षण करणार्‍या आणि औक्षण करवून घेणार्‍या अशा दोन्ही जिवांना सात्वीक लहरींचा लाभ मिळतो. सोन्याने ओवाळण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे सोन्यासारखा निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य तुम्हाला लाभो.

सुपारीने ओवाळ्याचे कारण सुपारीसारखे टणक हो आणि तुम्हाला अविनाशी आयुष्य लाभो. अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकण्याचा अर्थ अविनाशी हो असा होतो. तर सगळ्यात शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवला जातो आणि ‘कापसासारखा म्हातारा हो’ असे म्हटले जाते. तेव्हा तुम्हीसुद्धा औक्षणचा लाभ नक्की घ्या आणि संधी मिळाली तर नक्की औक्षण करा.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.