Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जे कांग्रेसमध्ये घडलं, तेच भाजपने केलं; अनंतराव देशमुख पुन्हा अपक्ष निवडणूक लढणार?

9

Anantrao Deshmukh Cast Election: भाजप नेता अनंतराव देशमुख हे अपक्ष निवडणूक लढणार असेल तर त्याचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जर, अनंतराव देशमुख निवडणूक लढवणार असतील तर भाजपला दोन जागांवर फटका बसेल असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Lipi

पंकज गाडेकर, वाशिम: रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर जिल्ह्यातील दोन जागेवर भाजपला फटका बसेल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी युतीत भाजपला वाशिम आणि कारंजा मतदारसंघ तर रिसोड मतदारसंघ शिंदेंच्या सेनेला सुटला आहे. माजी खासदार आणि विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

परंतु भाजपचे इच्छुक उमेदवार माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी इथे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यांनी बंडातून माघार न घेतल्यास भाजपला दोन जागेवर फटका बसेल असा इशारा सेना पदाधिकाऱ्यांनी दिला असून असे झाल्यास जिल्ह्यात युतीत उभी फूट पडून भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो. उद्या सोमवारी नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अनंतराव देशमुख हे निवडणूक रिंगणातून माघार घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Amit Ghoda Not Reachable: पालघरमध्ये चाललंय काय? वनगानंतर महायुतीचा आणखी एक नेता नॉट रिचेबल, २४ तासांपासून संपर्क होईना

आसमान से टपके खजूर मे अटके

विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी अनंतराव देशमुख यांनी एक वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, रिसोड मतदारसंघ शिंदेच्या सेनेला सुटल्याने अनंतराव देशमुख यांची मोठी निराशा झाली आहे. काँग्रेस उमेदवारी देत नसल्याने दोन वेळा बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर आता भाजपमध्ये गेल्यावरही तेच दुखणं देशमुख यांच्या वाटेवर आलं. मागील वर्षभरापासून त्यांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली होती. तर भाजपनेही त्यांच्या पाठीमागे बळ उभे करत त्यांच्या मागणीनुसार कोट्यावधी रुपयांचा निधी या मतदारसंघात विकास कामांसाठी दिला होता. मात्र, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आणि अनंतराव देशमुख यांची मोठी अडचण झाली.

Anantrao Deshmukh: आसमन से टपके… जे कांग्रेसमध्ये घडलं, तेच भाजपने केलं; अनंतराव देशमुख पुन्हा अपक्ष निवडणूक लढणार?

मात्र, सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेचा दावा हा केवळ भाजपवर दबाव टाकून दुसरा एखादा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी असल्याचं बोललं जात होतं. मात्र, प्रत्यक्ष वाटाघाटीत एकनाथ शिंदे यांनी या मतदार संघावर तडजोड करणार नसल्याचं सांगत भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही भाजप अनंतराव देशमुख यांना एबी फॉर्म देईल आणि इथे मैत्रीपूर्ण लढत होईल असेही भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून सांगण्यात आले होते. मात्र, तेही घडलं नाही आणि देशमुख यांना पुन्हा अपक्ष मैदानात उतरावे लागत असल्याने आसमन से टपके, खजूर मे अटके अशी काहीशी परिस्थिती अनंतराव देशमुखांची झाली आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.