Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाहू महाराजांसमोर मधुरिमांची माघार, सतेज पाटील भडकले; कोल्हापुरातील राड्यामागे खरं कारण काय?

3

Satej Patil: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे सतेज पाटील संतापले. त्यांनी त्यांचा राग शाहू महाराजांसमोर व्यक्त केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापूर: उत्तर कोल्हापुरात आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. संपूर्ण राज्यात बंडखोरांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरु असताना, अधिकृत उमेदवारांचा मार्ग सुकर करण्यासाठी शिष्टाई सुरु असताना कोल्हापुरात उलट घडामोडी घडल्या. बंडखोर माघार घेत नसल्यानं काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले. आपल्याला तोंडावर पाडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या चेहऱ्यावर राग अगदी स्पष्ट दिसत होता. मधुरिमा यांच्या माघारीमुळे आता उत्तर कोल्हापुरात महायुती विरुद्ध अपक्ष उमेदवार असा संघर्ष रंगणार आहे.

उत्तर कोल्हापुरातून काँग्रेसनं आधी राजेश लाटकर यांनी तिकीट दिलं. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी उमेदवारीस विरोध केला. पक्ष कार्यालयावर दगडफेक झाली. मग पक्षानं लाटकर यांचं तिकीट रद्द करत खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरिमा राजे यांना संधी दिली. त्यानंतर लाटकर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. खासदार शाहू महाराज, सतेज पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.
मंचावर भोजपुरी गाणी अन् नाचणारी तरुणी! ही लाडकी बहीण योजना? राज ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
माझ्यामुळे राजघराण्यात खासदारकी आहे. आता आमदारकीदेखील आमच्याच घरात आल्यास त्यामुळे चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका शाहूंनी घेतली. त्यांनी लाटकरांशी संपर्क साधला. दुपारी अडीचपर्यंत तुम्ही अर्ज मागे घ्या. तुम्ही माघार न घेतल्यास आम्ही २ वाजून ३५ मिनिटांनी अर्ज मागे घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. लाटकरांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे मधुरिमा राजे अर्ज मागे घेण्यास गेल्या.
Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांची अचानक माघार; गेल्या दोन दिवसांत पडद्यामागे काय घडलं? घटनाक्रम समोर
या सगळ्या घटनांबद्दल सतेज पाटील अनभिज्ञ होते. त्यांना हा प्रकार समजताच ते सभा सोडून तडकाफडकी निघाले. त्यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. अर्ज मागे घेण्यास गेलेल्या मधुरिमांना ते शोधत होते. त्या एका केबिनमध्ये बसल्या होत्या. तिथे जाऊन सतेज पाटील यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. लढायचंच नव्हतं तर तसं सांगायचं होतं. मला तोंडावर पाडायची काय गरज होती, असा सवाल त्यांनी विचारला.

Satej Patil: शाहू महाराजांसमोर मधुरिमांची माघार, सतेज पाटील भडकले; कोल्हापुरातील राड्यामागे खरं कारण काय?

तितक्यात त्या केबिनमध्ये मधुरिमा राजे यांचे पती मालोजीराजे पोहोचले. त्यांनी मधुरिमा यांचा हात धरला आणि तिथून त्यांना घेऊन थेट अधिकाऱ्यांसमोर पोहोचले आणि अर्ज माघारी घेतला. घडलेल्या प्रकारामुळे संतापलेले सतेज पाटील तिथून निघाले. कारकडे जाताना त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. लढायची हिंमत नव्हती, तर आधीच सांगायचं ना. मी माझी ताकद दाखवली असती, असं म्हणत ते कारमध्ये बसले आणि पत्रकारांशी काहीही न बोलता थेट निघून गेले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.