Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपने तिकीट कापल्यावर उद्धव दादाचा फोन, पुण्यात भाजप कार्यकर्त्याचा खून

5

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राची ही अवस्था आहे, पुढच्या दहा वर्षांची काय असेल. राजकारणाची भाषा बदलली, कोणीही उठून टीव्हीवर शिव्या देत आहेत. असे राजकारण असेल तर भविष्यातील पिढ्यांनी काय करायचे, अशा प्रकारच्या व्यभिचार करणाऱ्यांना तुम्ही वठणीवर आणणार नसाल तर महाराष्ट्राला परमेश्वरच वाचवू शकतो. बातमी वाचा सविस्तर…
२. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा 23 नोव्हेंबर ला निकाल लागेल, त्या दिवशी महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार परत सत्तेत आल्याचं घोषित होईल. कोकणातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही जागांवरती महायुतीचे उमेदवार हे विजयी होतील. कुडाळ मालवण मतदारसंघातून लोकसभेमध्ये काम केलेले उमेदवार निलेश राणे हे पन्नास ते साठ हजार मतांच्या फरकाने निवडून येतील, असं भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये राणे बोलत होते. माहीमच्या जागेबाबत सरवणकरांना पाठिंबा देणार की नाही? यावर बोलताना टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

३. शिवसेना आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांची नव्हे, तर बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी आहे. कितीही वैचारिक वाद असले, तरी राष्ट्रवादी आणि घड्याळ ही शरद पवार यांची प्रॉपर्टी आहे, अजित पवार यांची नव्हे,’ अशी तिखट टीका करत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारण्यांना सोमवारी लक्ष्य केले.

४. नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांतील बहुतांश बंडोबांची मनधरणी करण्यात नेत्यांना यश आल्याने माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून डॉ. हेमलता पाटीलसह तीनही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याने या ठिकाणी आता तिरंगी लढत रंगणार आहे.

५. राजकारणातील अनेक घराण्यांमध्ये पक्षापलिकडचे स्नेहसंबंध आहेत. मुंडे, महाजन, ठाकरे, पवार या बड्या राजकीय परिवारांमध्ये असाच ओलावा दिसून येतो. महाजन आणि ठाकरे कुटुंबातील नातं फार जुनं आहे. भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे संबंध पुढच्या पिढीतही जपले आहेत.

६. १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने उभी फूट पडली आहे. महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेचे विजय चौगुले व विजय नाहटा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या (ता.४) दिवशी दोघांनीही अर्ज मागे न घेता बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता दोन्ही मतदार संघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारापुढे या दोन्ही अपक्षांचे तगडे आवाहन उभे ठाकले आहे.

७. पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण काही करता कमी होत नाहीय. याचदरम्यान, मावळ येथील पवनानगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. भाजप पदाधिकाऱ्याचा हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मित्रासह तिघांना अटक केली. बातमी वाचा सविस्तर…

८. ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली सध्या एका घरगुती वादामुळे चर्चेत आहे. तिची सावत्र मुलगी ईशा वर्माची चार वर्षांपूर्वीची जुनी पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये ईशाने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले होते. ईशाने पोस्टमध्ये दावा केला की, जेव्हाही तिने अश्विन वर्माशी म्हणजेच तिच्या वडीलांशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अभिनेत्रीने तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता एका मुलाखतीत तिने काही नवे धक्कादायक दावे केले आहेत.

९. बहुतेक नोकरदार लोकांचा पीएफ अधिक काळ सुरू असतो. अशा परिस्थितीत, काही कारणास्तव तुम्हाला तुमच्या पीएफमध्ये नॉमिनीचे नाव बदलायचे असेल, तर आता ही प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे ज्यामध्ये याआधी अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या विशेषतः जेव्हा काम ऑफलाइन व्हायचे. पण आता तुम्ही अशी अनेक कामे फक्त ऑनलाइन करू शकता.

१०. क्रिकेटच्या मैदानातील ‘किंग’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली प्रेमाच्या बाबतीत ‘ग्रीन फ्लॅग’ असल्याचे अनेकदा बोलले जाते. पत्नी अनुष्का शर्मासोबत विराटचे बाँडिंग, व्यग्र वेळापत्रकामधूनही विराटचा तिची काळजी घेण्याचा स्वभाव आणि त्याचा ‘फॅमिली मॅन’ अंदाज महिलावर्गाला विशेष आवडतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, अनुष्काआधी त्याचे नाव बॉलिवूडच्या विविध हसीनांसोबत जोडले गेले आहे. त्यामुळे असे म्हणायला हरकत नाही की, विराट आणि बॉलिवूडचे नाते फार जुने आहे. बातमी वाचा सविस्तर…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.