Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेप्रमाणे विधानसभा अवघड जाणार?

11

Chandrapur Political News: भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोष सिंह रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ. गावातूरे अशी इथे लढत होणार आहे. डॉ. गावतुरे यांनी लोकसभेच्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.

हायलाइट्स:

  • बल्हारपूर मतदारसंघात तिहेरी लढत
  • सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेप्रमाणे विधानसभा अवघडच
  • तिहेरी लढत होण्याचं चित्र निर्माण झालं आहे
Lipi
चंद्रपूर बल्हारपूर मतदारसंघ

निलेश झाडे, चंद्रपूर : एखाद्या अपक्ष उमेदवाराची फार चर्चा होत असेल तर तो उमेदवार प्रस्तापित उमेदवाराला टक्कर देणारा आहे, हा संदेश दुरवर पोहचतोय. लोकसभेत सुधीर मुनगंटीवार यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कदाचित त्याचमुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढण्याची स्पर्धा रंगली होती. आता बल्हारपूर मतदार संघातून बंडखोर आणि काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणाऱ्या या मतदार संघात डॉ. अभिलाषा गावातूरे यांच्यामुळे तिहेरी लढत होण्याचं चित्र निर्माण झालं आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोष सिंह रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ. गावातूरे अशी इथे लढत होणार आहे. डॉ. गावतुरे यांनी लोकसभेच्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. केवळ काँग्रेसही त्यांची ओळख नाही. सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या नावाचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे. याचा फायदा त्यांना निवडणूकीत होताना दिसत आहे. संतोष सिंह रावत हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे परंपरागत मते त्यांना मिळणार आहेत. मूल आणि पोंभुर्णा तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते पसरले आहेत. याचा फायदा त्यांना होवू शकतो. बल्हारपूर मतदारसंघ मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला ठरला आहे. या क्षेत्रात त्यांनी भरीव विकासकामे केली आहेत. मात्र त्यांचा विकास अनेकांना रुचलेला दिसत नाही.
Raj Thackeray: भाजपला बाय न् शिंदेंची कोंडी; राज ठाकरेंनी फिल्डींग लावली; किती जागांवर छुप्या युतीची चर्चा?

लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती जिल्हाला आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिने कलावंत यांची चंद्रपुरात लोकसभा निवडणुकीत मोठी रेलचेल दिसली होती. मात्र त्याचा फायदा मुनगंटीवारांना झालेला नाही. त्यामुळे लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणूक मुनगंटीवार यांना जरा अवघडचं झालेली दिसत आहे . या मतदारसंघात तिहेरी लढत होईल, अशी चर्चा सुरु आहे. तसे झाले तर मुनगंटीवार यांना ती धोक्याची सूचना ठरणार आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.