Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Election Commision Media Control Room: डिजिटल युगात सोशल मीडियातून प्रचार करण्यावर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर असतो. पण उमेदवार आणि कार्यकर्त्यांनो सावधान. या माध्यमांवरही आता निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. यासाठी स्थापन केलेल्या माध्यम संनियंत्रण कक्षात बसलेले अधिकारी २४ तास यावर नजर ठेवून आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयत हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे बसविण्यात आलेल्या टीव्ही संचावर एकाच वेळी विविध वृत्तवाहिन्यांवरील बातम्या सुरू आहेत. त्यावर अधिकारी सतत नजर ठेवून आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर नजर ठेवणारे पथकही आहे. याशिवाय सायबर क्राईम पोलिसांचे एक पथकही या कक्षात तैनात करण्यात आले आहे. रोजची वर्तमानपत्रेही येथे बारकाईने पाहिली जातात. कोठे काही आक्षेपार्ह आढळून आले की संबंधितांना नोटीस पाठविली जाते.
जाहिरातींना मान्यता घेऊन, त्यांचा अधिकृतपणे खर्च दाखवून त्या प्रकाशित करण्यास भाग पाडले जाते. प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच आतापर्यंत २३ प्रकरणांत नोटीसा पाठवून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मीडिया सेलला आपला प्रचार चौकटीत बसवूनच करावा लागत आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर तेही पकडले गेल्याची उदाहरणे घडली आहेत.
Ajit Pawar: आधीच जागा कमी, त्यात काकांचं टेन्शन, आता मित्रपक्षांमुळे अडचण; अजितदादांच्या समस्या संपेनात
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय निवडणूक आयोगाचे विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी या कक्षालाही भेट दिली. तेथील कामकाजाची माहिती घेतली. सुनियोजित पद्धतीने होणारे माध्यम संनियंत्रण आणि समाज माध्यमावरील जाहिराती आणि चुकीच्या पोस्टबद्दल बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
श्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, निवडणूक यंत्रणेवरचा नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल, अशी कामगिरी करावी. अवैध मद्य किंवा पैशाची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर सर्वेक्षण अणि भरारी पथकासोबतच विशेष पथकाद्वारे विविध भागात अचानकपणे वाहनांची तपासणी करावी. निवडणूक विषयक यंत्रणेकडे आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी आणि कालमर्यादेत निराकरण करावे. सिव्हिजीलद्वारे आलेल्या तक्रारींवर १०० मिनिटाच्या आत कार्यवाही होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेच्या तयारीची माहिती दिली. कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रात सर्व सुविधा निर्माण करून प्रत्येक मतदारसंघात असे तीन आदर्श मतदान केंद्र असतील, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत विविध पथकाद्वारे २८ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिर्डी आणि राहुरी मतदारसघांत प्रत्येकी एक सहाय्यकारी मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मतदानासाठी १२ हजार ५७२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २ हजार ३२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.