Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 7 नोव्हेंबर 2024: सिंह राशीसाठी अती घाई संकटात नेई ! धनू राशीने रहावे सावध, खोटे आरोप होण्याची शक्यता ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 7 November 2024 In Marathi : 7 नोव्हेंबर, आज गुरूवार, मेष राशीला मेहनतीचे फळ मिळेल पण पाहुण्यांमुळे खर्च वाढणार आहे. वृषभ राशीचे जे जातक कला- साहित्य क्षेत्रात आहेत त्यांचा मानसन्मान वाढेल. कर्क राशीची कार्यक्षेत्रात प्रगती, शुभलाभाचा योग तर वृश्चिक राशीला व्यवसायात नवीन संधी असून कामात फोकस हवा. मीन राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यापासून सावध रहावे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : मेहनतीचे फळ मिळेल, पाहुण्यांमुळे खर्च वाढणार
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत चढ-उतारांनी भरलेला आहे. तुमची मेहनत तुम्हाला यशोशिखरावर घेवून जाणार आहे. कठोर परिश्रम केले तरच फायदा होईल. संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन त्यामुळे खर्च वाढणार तसेच पाहुण्यांना वेळ द्यावा लागेल. महत्त्वाचे कामासाठी प्रवासाचा योग आहे, तसेच तुमची थांबलेले कामे पूर्ण होतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि कामे मार्गी लागतील.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : कला- साहित्य क्षेत्रात मानसन्मान वाढणार
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तब्येत सांभाळा. कामाचा अती ताण तुमचे टेन्शन वाढवू शकतो. तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा आणि जंक फूड खाणे कमी करा. तुम्ही कला किंवा साहित्य क्षेत्रात आहात तर तुमची प्रतीष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुमचा लाभ होणार आहे. शुभ कार्यासाठी खर्च करणार आहात.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थितीत सुधार, व्यवसायात प्रगती
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरमध्ये लाभ आणि व्यवसायात प्रगती आहे. आर्थिक स्थितीत वाढ होवून मन प्रसन्न राहील. काही थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत. बुद्धी आणि कौशल्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला यश मिळेल. राजकीय क्षेत्रातील गोंधळ कमी होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात प्रगती, शुभलाभाचा योग
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नोकरी, व्यवसाय किंवा तुम्ही जर राजकीय क्षेत्रात असला तर तुम्हाला यश मिळेल. तुम्ही विचार केलेली सर्व कार्य पूर्ण होणार आहेत. तुमच्या जीवनातील प्रगती वेगाने होणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने लाभ होणार असून बँक बॅलन्स वाढेल. खर्च कमी करा अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील आणि थांबलेले कामे पूर्ण होतील.
सिंह आर्थिक राशिभविष्य : कामात घाई नको, व्यवसायात चढ- उतार
सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक असून करिअरच्या बाबतीत लाभ होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात अनुकूल परिणाम मिळतील. कोणतेही काम करताना घाई करू नका. कार्यक्षेत्रात प्रगती करण्याची मोठी संधी आहे. व्यवसायात काही चढ- उतार आहेत पण ते ठिक होतील. तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल तर ते परत मिळेल. तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील. प्रवासाचा योग असून त्यात लाभ आहे.
कन्या आर्थिक राशिभविष्य : कामात नशिबाची साथ, करिअरमध्ये प्रगती
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून करिअरमध्ये प्रगती आहे. आज प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व कामे वेळत पूर्ण होतील त्यामुळे मनाला शांतता मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ताणतणाव आहे, तेव्हा सावध राहा. विद्यार्थ्यांना मेहनत करण्याची गरज असून कुटुंबातील संपत्तीवरून घरात वादाची शक्यता आहे. व्यापारात लाभ होईल त्यामुळे गुंतवणुकिचा विचार नक्की करा.
तुळ आर्थिक राशिभविष्य : व्यापारात उत्तम नफा, नवीन कार्याची सुरूवात
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. तुमचे कोर्ट कचेरीत काम असेल तर ते मार्गी लागेल. आज एखाद्या कामामुळे तुमचा फायदा होणार आहे. मालमत्तेच्या व्यापारात लाभ आहे. मुले तुम्हाला चांगली बातमी देतील. आज काही नवीन कार्याची सुरुवात होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि दिवस समाधानात जाणार आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात नवीन संधी, कामात फोकस हवा
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धनसंपत्ती वाढ असून थांबलेले कामे पूर्ण होतील. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होणार असून व्यवसायात नवीन संधी मिळतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना कठोर परिश्रम आणि फोकस महत्त्वाचा आहे. काही गोष्टी समजूतीने घ्या, म्हणजे कामे लवकर मार्गी लागतील. व्यवसायात लाभ असून आज दिवसभराच्या कामाने आणि यशामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
धनू आर्थिक राशिभविष्य : खर्च जास्त, खोटे आरोप होतील
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून मुलांकडून चांगली बातमी मिळेल. करिअरमध्ये तुमची प्रगती होणार असून नशिब तुम्हाला उत्तम साथ देईल. नवीन खर्च अचानक उभे राहतील तसेच काही खोटे आरोप देखील होतील, सावध राहा. प्रवासाचे योग असून त्यात लाभ होईल, तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात लाभ असून तुमचे थांबलेले पेमेंट तुम्हाला मिळेल.
मकर आर्थिक राशिभविष्य : नोकरी – व्यवसायात व्यवस्थापनाची गरज
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरमध्ये लाभ असून शुभलाभाचे संकेत आहे. नोकरी असो वा व्यवसाय तुम्हाला योग्य व्यवस्थापनाची गरज आहे. व्यवसायात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात संपर्क वाढतील आणि भविष्यात त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती आणि समाजात मान-सन्मान वाढेल. आज कोणतरी एखादा प्रस्ताव ठेवेल त्याला नकार द्या. आज नवे काही करू नका त्यात लाभ होणार नाही.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : व्यवहार करताना सावध राहा, फसवणुकिची शक्यता
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या बाबतीत यश देणारा आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा, फसवणुकिची शक्यता आहे. खर्च जास्त झाल्यामुळे तुम्ही कर्ज घ्याल. घरातील कामे करताना तुमची खूप धावपळ होणार आहे. तुमची कार्यक्षमता पाहून सगळेजण प्रभावित होतील तसेच संध्याकाळी काही विशेष काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल आणि प्रगती होईल.
मीन आर्थिक राशिभविष्य : गुंतवणूक करण्यापासून सावध राहा
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ओके आहे पण नुकसान होण्याची शक्यता आहे. कुठेही गुंतवणूक करण्यापासून सावध रहा. विरोधकांवर आज तुम्ही भारी पडाल. घरात तुमच्याबद्दल आदर वाढेल, तुमचा सगळेजण मान-सन्मान करतील. तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात.