Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Yogi Adityanath in Washim Sabha Highlights for vidhan sabha election: ‘ही महाआघाडी नव्हे तर महाअनाडी आहे’ अशी योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे
राज्यात सध्या निवडणुका सुरू असून यामध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती लढत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रूपाने महाअनाडी निवडणूक लढवत आहेत. ज्यांना देश आणि धर्माची चिंता नाही. ज्यांना राष्ट्रीयत्वाची चिंता नाही, ज्यांना समाजामध्ये मूल्य आदर्शाच्या मर्यादेची चिंता नाही, असे हे महाअनाडी गठबंधन आहे, असा हल्लाबोल योगींनी केला.
बटेंगे तो कटेंगेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली
छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचा संदेश दिला होता. त्यावरूनच आपल्याला बटेंगे तो कटेंगेची प्रेरणा मिळाली असल्याचे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले.
शिवाजी महाराजांचा संघर्ष असो की संभाजी महाराजांचा संघर्ष आपल्याला नवी प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं होतं. प्रत्येक भारतवासीयाला आपल्या सेनेचा हिस्सा बनवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचं प्रदर्शन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यावरूनच प्रेरणा घेऊन मी वारंवार सांगतो. ‘बटिये मत. क्युकी जब भी बटे थे तब कटे थे, एक है तो नेक है, एक है तो सेफ है, हमे बटना नही है, एकजुट होना है, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांची अफजल खान व औरंगजेब यांच्यात गफलत
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाशिमच्या सभेमध्ये बोलताना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगरच व्हायला पाहिजे हे सांगत असताना अफजल खान आणि औरंगजेब यांच्यात गफलत केल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफजलखानाला मारलं होतं त्याच्या नावावरून औरंगाबाद नाव असणं हे हटवायलाच पाहिजे, संभाजीनगरच्या रूपाने त्याला ओळख मिळाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा संघर्ष असो की संभाजी महाराजांचा आम्हाला प्रेरणा आणि आदर्श देतो, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
सभेला अल्प प्रतिसाद, जिल्हाध्यक्षासह दोन उमेदवार अनुपस्थित
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेचा नारळ वाशिममधून फोडला. मात्र या सभेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सई डहाके आणि रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार भावना गवळी या सभेला अनुपस्थित होत्या. त्यामुळे या तिघांना आमंत्रणच नव्हते की अशा चर्चांना उधाण आले आहे.