Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोकणात युतीमधील कुरबुरींवर मंत्री चव्हाणांची ‘मात्रा’; टेन्शन वाढलेल्या महायुतीचे उमेदवारांना दिलासा
Vidhan Sabha Nivadnuk: कोकणातील महायुतीच्या उमेदवारांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे प्रचार प्रमुख रविंद्र चव्हाण ३ दिवसांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी मतभेद बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्याचे आवाहन केले आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीतच युतीमधील वाद चव्हाट्यावर आले होते. पण आता या सगळ्यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत महायुती पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कान टोचत मात्र दिली आहे. त्यामुळे हे वाद मिटले आहेत असे बोलले जात असले तरीही अद्याप दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे महायुतीच्या प्रचारांमधून लांब असल्याचे पाहायला मिळत आहे.
पोर्शे कार अपघातावरून सुनील टिंगरेंची शरद पवारांना नोटीस; जाहीर सभेत सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट!
महायुतीच्या या बैठकांमधून मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की”कार्यकर्ता हीच महायुतीची मोठी ताकद आहे. सगळे वाद बाजूला ठेवा आम्हाला विश्वास आहे की महायुतीच्या २०० च्या आसपास जागा आपण जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांमध्ये महायुतीचे गुहागरचे उमेदवार राजेश बेंडल, रत्नागिरीचे उमेदवार उदय सामंत, दापोली खेड मंडणगडचे उमेदवार योगेश कदम, राजापूरचे उमेदवार किरण सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार विनय नातू, भाजप उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे,भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सामंत, जिल्ह्यातील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना निर्वाणीचा इशारा; जर तुम्ही जुने काही काढले तर इकडून देखील ‘करारा जबाब मिलेगा’
दापोलीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीरनामा; माजी आमदार सूर्यकांत दळवी अनुपस्थित
दरम्यान दापोली विधानसभेचे उमेदवार आमदार आमदार योगेश कदम, शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, भगवान घाडगे, भाजपाचे पदाधिकारी भाऊ इदाते,तालुकाध्यक्ष संजय सावंत, अजितदादांचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या साधना बोत्रे, रमा बेलोसे, आरपीआयचे प्रीतम रुके आदी महायुतीचे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन व जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या विधानसभा मतदारसंघात महायुती एकत्र आल्याने शिवसेनेला दिलासा मिळाला आहे.मात्र भाजपामध्ये ठाकरे सेनेतून काही वर्षांपूर्वी दाखल झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची मात्र अनुपस्थिती पहायला मिळाली. दरम्यान भाजप पक्षा विरोधात काम केलेल्या काही जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या उद्या रत्नागिरीचे ठाकरे गटाचे उमेदवार भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांचा समावेश आहे. आता यामध्ये अजून कोणाची नावे या यादीत वाढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.