Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य 11 To 17 नोव्हेंबर 2024 : गुरू-सूर्याचा समसप्तक योग !मेष, मिथुनसह 6 राशींची करिअरमध्ये प्रगती, प्रोजेक्ट पूर्ण होणार ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य
Weekly Career Horoscope, 11 To 17 November 2024: नोव्हेंबर महिन्याचा हा दुसरा आठवडा असून गुरु आणि सूर्य समसप्तक योग तयार करत आहेत. या शुभयोगाचा फायदा मेष, मिथुन आणि इतर 6 राशीसाठी लाभदायक आहे. करिअरमध्ये लाभ आणि घरात सुखसमाधान असेल. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या. तसेच मेष ते मीन पर्यंत आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल, चला तर पाहूया या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य.
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रोजेक्टसाठी आर्थिक मदत मिळेल
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून ऑफिसच्या कामात प्रगती असून तुमचा मान सन्मान वाढणार आहे. प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी आर्थिक मदत लागेल आणि ती मदत तातडीने मिळेल. तुमचा प्रोजेक्टे पूर्ण होवून तुम्हाला यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळाल्यामुळे आनंद गगनात मावेनासा होईल. तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबात वातावरण सुखशांती आणि समाधानाचे असेल. प्रवासाचा योग असून यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणते ही काम करताना सावध राहा.
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : मेहनतीचे फळ मिळणार
हा आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला असून कष्टाचे फळ मिळेल. तुम्हाला जे हवे होते ते प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना मनाचे ऐका, उत्तम परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा आहे. व्यवसायात भागिदारी चांगली आहे. सकारात्मक विचार करा, कामे पटापट मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद घालू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कामात चढउतार, महिलेमुळे आर्थिक लाभ
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम घेवून येणार आहे. कार्यक्षेत्रात चढ-उतार असून आर्थिक बाबतीत काही नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रत्येक कामात सतर्क आणि सावध राहा. एखाद्या महिलेच्या मदतीमुळे धन आणि सुखसमृद्धीचे योग जुळून येत आहेत. प्रवासात यश असून प्रवास सुखकर असेल. आर्थिक बाबतीत भविष्याच्या दृष्टीने विचार करा, उत्तम परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी सुखद बातमी मिळेलय.
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कामात अहंकार आणू नका
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. कुटुंबाला वेळ देणार आहात त्यामुळे मानसिक समाधान मिळेल पण घरातील काही गोष्टींमुळे तुम्ही थोडे काळजीत असाल. ऑफिसच्या कामात अहंकारामुळे प्रोजेक्टवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. तब्येत थोडी अस्वस्थ राहील, डॉक्टरांचा सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी, सुख-समृद्धीचे शुभ संयोग आहेत.
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवासामुळे यश, आर्थिक स्थिती ठिक
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत प्रगती चांगला असून प्रवासातून तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात हळूहळू वातावरण बदलत असून सुखशांतीचा अनुभव मिळेल. ज्येष्ठ महिला तुम्हाला मदत करेल त्यामुळे समस्येवर मार्ग सापडेल. ऑफिसच्या कामात फोकस ठेवा, काही चुकीच्या समजुतीमुळे तुम्हाला ताणतणावाचा त्रास होवू शकतो. आर्थिक स्थिती ठिक आहे पण खर्च जास्त होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करेल त्यामुळे थांबलेली कामे मार्गी लागतील.
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : गुंतवणुक करा फायदा होईल
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. गुंतवणुक करा तुम्हाला चांगला फायदा होईल, तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे, फक्त पथ्य सांभाळा. कोणतेही काम करताना संयम ठेवा, तरच तुम्हाला सुख समाधान मिळेल. ऑफिसच्या कामासंदर्भात वाईट बातमी मिळणार असून, तुम्ही दुःखी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी भविष्याच्या दृष्टीने विचार करून त्यानुसार नियोजनास सुरुवात कराल.
तुळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : ऑफिसच्या कामात प्रगती
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ऑफिस आणि व्यवसाय स्थळी प्रगती घेवून येणारा आहे. त्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम दिसतील. भागीदारीत केलेला प्रोजेक्ट लाभ देणार आहे. आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग असून घरात सुखशांती समाधान मिळेल. प्रवासाचा योग असून ठिक ठिक यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी करिअरमध्ये यश असून कठीण परिस्थितीतून मार्ग काढाल.
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नवीन गोष्टी शिकणार, आर्थिक स्थिती ठिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे तुम्हाला यश मिळेल. नवीन गोष्टी शिकणार आहात आणि त्याचा उपयोग तुमच्या प्रोजेक्टमध्ये कराल त्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती ठिक आहे पण खर्चावर कंट्रोल करणे खूप गरजेचे आहे. तब्येतीची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबात मतभेदाची शक्यता आहे, काही सदस्यांबदद्ल तुमच्या मनात नाराजी असेल. प्रवासात शुभ योग आहे त्यामुळे प्रवास नक्की करा.
धनु साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : भागीदारीतील प्रोजेक्टमध्ये यश
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ऑफिसच्या कामात प्रगती घेवून येणारा आहे. तुमचा मानसन्मान वाढेल तसेच भागीदारीत केलेले प्रोजेक्ट तुम्हाला यश देतील. आर्थिक स्थितीत सुधारणा करायची असेल तर तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल. कोणताही निर्णय घाई गडबडीत घेवू नका, शांतपणे नीट विचार करा. काही कारणामुळे मानसिक ताणतणाव वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी भविष्याच्या बाबतीत विचार कराल आणि त्यानुसार रणनीती आखण्यात सुरुवात कराल.
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नवीन सुरुवात होणार, खर्चावर कंट्रोल ठेवा
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक असून एक नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. जीवनात प्रगतीच्या वाटेवरून तुम्ही प्रवास करत आहात. कुटुंबात कोणाचे तरी आजारपण तुमच्या काळजीचे कारण असेल. ऑफिसचे काम तुमचे टेन्शन वाढविणार आहे. काही कारणामुळे तुम्ही निराश होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत, खर्च वाढतील, त्यावर कंट्रोल करा. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण विचार करूनच एखादा निर्णय घ्या तरच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामात प्रगती देणारा असून प्रोजेक्ट यशस्वी होतील. आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात वातावरण ठिक असेल तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा चांगला परिणाम दिसेल. प्रवासात यश असून मन प्रसन्न राहील. जास्त हव्यास करू नका, तुम्हाला त्रास होवू शकतो, आठवड्याच्या शेवटी याची अनुभूती होईल. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे.
मीन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक बाबतीत अडचणीची शक्यता
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून तुमच्या बोलण्यामुळे ऑफिसच्या कामात सकारात्मक परिणाम दिसतील. कुटुंबातील सुखी समाधानी वातावरण पाहून तुम्हाला आनंद होईल. तब्येतीत सुधारणा असून खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत काही अडचणी येऊ शकतात, तुम्ही एखादे काम पूर्ण करु असे सांगाल पण ते होणार नाही. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचा योग असून प्रवास करताना सतर्क राहा.