Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election Exit Poll: राज्यात सत्ताधारी महायुतीला १२१, तर महाविकास आघाडीला १५० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इलेक्टोरल एजनं केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आलेली आहे.
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. राज्यात भाजप ७८ जागांसह सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे. तर शिवसेनेला २६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती १२१ जागांपर्यंत मजल मारु शकते, असा अंदाज इलेक्टोरल एजनं वर्तवला आहे.
Karale Master: तो आला, एकही शब्द न बोलता थेट मारु लागला! कराळे मास्तरांवर हल्ला, भाजपवर आरोप
दुसरीकडे महाविकास आघाडी १५० जागांसह बहुमताच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. काँग्रेस ६०, शिवसेना उबाठाला ४४, तर राष्ट्रवादी शपला ४६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या अडीच वर्षांत दोन प्रादेशिक पक्षांत फूट पडली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाहायला मिळाली. आता विधानसभा निकालातून मतदार खरे पक्ष कोणाचे याचे निकाल लावताना दिसत आहेत. इलेक्टोरल एजनुसार अन्य पक्षांना आणि अपक्षांना २० जागा मिळू शकतात.
मागील ५ वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. गेल्या निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेना युतीला कौल दिला. पण मुख्यमंत्रिपदावरुन युतीत फिस्कटलं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तर सर्वाधिक १०५ जागा मिळूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं.
शरद पवारांच्या नेत्याला मारहाण; भडकलेल्या कार्यकर्त्यांनी EVM फोडले; धनंजय मुंडे संतापले
जून २०२२ मध्ये शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी ठाकरे सरकार कोसळलं. पुढे शिंदे मुख्यमंत्री झाले. यांच्या गटाला निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यांच्याच पक्षाला धनुष्यबाण चिन्हदेखील मिळालं. त्यामुळे ठाकरेंना धक्का बसला.
वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्त्वात ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत युती सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांचे ९ सहकारी शिंदेंच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. शिंदे यांच्याप्रमाणेच अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला. तो मान्य करण्यात आला. त्यामुळे शरद पवारांना मोठा हादरा बसला.