Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 22 नोव्हेंबर 2024: कर्क राशीने विरोधकांकडे दुर्लक्ष करावे ! धनू राशीसाठी वादविवादाची शक्यता ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 22 November 2024 In Marathi : 22 नोव्हेंबर, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला अचानक धनप्राप्ती होणार आहे. वृषभ राशीला व्यवसायात कष्ट असून वरिष्ठ रागावतील. सिंह राशीच्या जातकांनी षडयंत्रापासून दूर राहा आणि व्यवहार करताना सर्तक राहा. तुळ राशीचे टेन्शन वाढण्याची शक्यता तर वृश्चिक राशीचे लोक दिवसभर व्यस्त राहणार आहेत. मकर राशीचे लोक उत्साहाने कामे करतील आणि त्यांचा कामातील वेग पाहून विरोधक शांत होतील. मीन राशीला प्रत्येक कामात किंवा स्पर्धेत यश मिळेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : धनलाभाचा योग, नवे संपर्क फायदा देतील
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला अचानक धनप्राप्ती होणार आहे. आध्यात्मिक बाबतीत रूची वाढेल आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे नेहमीचे काम व्यवस्थित पूर्ण करा. काम करताना आळस, निष्काळजीपणा दूर ठेवा. कोणतेही काम सुरु करताना त्याचा अभ्यास करा. नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होईल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : वरिष्ठ रागावतील, व्यवसायात कष्ट जास्त
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. ऑफिसमध्ये वरिष्ठ रागावतील. व्यवसायात तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. तुमचे सामाजिक संबध तुमच्या मदतीला येणार आहेत. नवीन योजनांकडे लक्ष द्या आणि त्याची रणनीती नीट सुरु करा. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल. तुमचे थांबलेले पेमेंट तुम्हाला मिळेल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : मेहनत खूप आहे, धनलाभाची शक्यता
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. नोकरी आणि व्यवसायात काही समस्या असतील तर त्या दूर होतील. संध्याकाळी धनलाभाची शक्यता आहे. कोणते ही काम किंवा व्यवसाय छोटा नसतो, तुमच्या अनुभवावर तुम्ही जग जिंकू शकता. आता मेहनत आहे असे वाटेल पण तुम्हाला यश नक्की मिळेल. संध्याकाळी प्रियजनांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात.
कर्क आर्थिक राशिभविष्य : विरोधकांच्या टीकेवर लक्ष देवू नका
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुम्हाला समाधान मिळेल. विरोधकांच्या टीकेवर लक्ष देवू नका. तुम्ही दिवसभर कामात व्यस्त राहणार आहात. सामाजिक संंबंध तुमच्या मदतीला धावून येतील. व्यवसायात काम भरपूर आहे पण त्याचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आहे.
सिंह आर्थिक राशिभविष्य : षडयंत्रापासून दूर राहा, व्यवहार करताना सर्तक राहा
सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे फक्त काही गोष्टी तुमचे टेन्शन वाढवतील. अफवा, षडयंत्र यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आज खूप मेहनत घ्यावी लागेल. सामाजिक जबाबदारी वाढणार आहे. अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करू नका.
कन्या आर्थिक राशिभविष्य : धनलाभाचा योग, रागावर नियंत्रण हवे
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धनलाभाचा असून व्यवसायात तुम्हाला लाभ होणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला कामात मदत मिळेल. क्रिएटीव्ह कामे करणार आहात त्यामुळे लाभ होईल. कोणत्याही विपरीत परिस्थितीत तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्या सुटतील. सरकारी कामे मार्गी लागतील. संध्याकाळी धनलाभाची शक्यता आहे.
तुळ आर्थिक राशिभविष्य : टेन्शन वाढण्याची शक्यता
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. काम पूर्ण करताना अनेक अडचणी येणार आहेत. समस्यांचे योग्य समाधान मिळाले नाही म्हणून टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाची आखणी कराल, सगळी तयारी होईल पण प्रवास स्थगित होईल. व्यवसायात समस्या, घरातील वातावरणात अशांतता यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : दिवसभर व्यस्त, सरकारी संस्थेकडून लाभ
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही व्यस्त राहणार आहात. तुम्ही जे काही ठरवले आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत कराल. वरिष्ठांसोबत आज संबंध चांगले असतील. ऑफिसमध्ये वातावरण उत्तम असेल. सरकारी संस्थेकडून तुम्हाला लाभ मिळेल. निराशावादी विचारांपासून दूर राहा. काही तरी सकारात्मक विचार करा. संध्याकाळी मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
धनू आर्थिक राशिभविष्य : वरिष्ठांसोबत वादाची शक्यता
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. वरिष्ठांसोबत वाद झाल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहून एखादी समस्या सुटेल असे पाहा. नवे संपर्क तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेवून जाणार आहेत. मित्रांसोबत दूरच्या प्रवासाला जाणार आहात. घरात वातावरण आनंदी आणि खेळीमेळीचे असेल.
मकर आर्थिक राशिभविष्य : विरोधक शांत असतील, खर्च वाढेल
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक नाही. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात ताणतणाव आहे. तुम्ही आज खूप मेहनत करणार आहात, तुमच्या कामाचा वेग पाहून विरोधक शांत होतील. पाहुणे येणार आहेत त्यामुळे खर्च वाढेल. मंगलकार्याची घरात चर्चा होवू शकते, आर्थिक तजवीज करावी लागेल.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : खरेदीवर जास्त खर्च होणार
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून तुम्ही जे काही ठरवले आहे ते पूर्ण होणार आहे. वाहन किंवा मालमत्ता यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार आहात. घरासाठी आज खरेदी कराल. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात लाभ आहे.
मीन आर्थिक राशिभविष्य : स्पर्धेत विजयी होणार, नवीन कामे मार्गी लागणार
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमचा वेळ समस्या सोडविण्यात जाणार आहे. कोणत्याही स्पर्धेत आज तुमचा विजय होईल. तब्येत सांभाळा, हवामान बदलामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवे प्रोजेक्ट मार्गी लागतील