Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सोलापुरात महाविकास आघाडीचा पराभव प्रणिती शिंदेंमुळेच, राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप; कारणही सांगितलं
Solapur Vidhan Sabha Praniti Shinde : सोलापुरात महाविकास आघाडीचा पराभव खासदार प्रणिती शिंदेंमुळेच झाल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्याने केला आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे दारुण पराभव झाल्याचा आरोप कारणांसह करण्यात आला आहे.
दक्षिण सोलापूर मतदार संघात प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी जाणूनबुजून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला. प्रणिती शिंदेंना महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्षाला पाठिंबा द्यायचा होता, तर त्यांनी पंधरा दिवसांअगोदर पाठिंबा द्यायला पाहिजे होता. खासदार म्हणून त्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती जबाबदारी हाताळली नाही. समन्वय ठेवला नाही, त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला, असा आरोप प्रशांत बाबर यांनी केला आहे.
उमेदवाराच्या नावाचा चुकून चुकीचा उल्लेख, विरोधकांकडून गोंधळ; पुण्यातील घटनेनंतर शरद पवार म्हणाले, वडिलांकडून…
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पराभवाला प्रणिती शिंदें जबाबदार –
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा अगदी अल्प मतांनी पराभव झाला. त्याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान अवताडे यांचा विजय झाला. भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित होते, परंतु ऐनवेळी भगीरथ भालके यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देऊन सर्वांना बुचकळ्यात टाकले.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार झाले आणि मतांची विभागणी झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल सावंत आणि काँग्रेसचे भगीरथ भालके तर बीजेपीकडून समाधान अवताडे. तिघांच्या लढतीत भाजपला आपोआप फायदा झाला, असा आरोप प्रशांत बाबर यांनी केला आहे.
Praniti Shinde : मुस्लिम उमेदवारीवरुन मतदारांनी प्रणिती शिंदेंना भररस्त्यात घेरले, सडेतोड उत्तर; म्हणाल्या, उमेदवारी दिली असती तर…
काँग्रेसचा बालेकिल्ला मध्य विधानसभा मतदारसंघ राखू शकल्या नाहीत –
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदें मागील पंधरा वर्षांपासून आमदार होत्या. मुस्लिम, पद्मशाली आणि मोची या समाजाचीमतदार संख्या अधिक आहे. २००९, २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा प्रणिती शिंदें आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या खासदार झाल्यानंतर या मतदारसंघात उमेदवार मुस्लिम, पद्मशाली किंवा मोची या समाजापैकी कुणाला तरी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.
Uddhav Thackeray : निकाल अनाकलनीय, महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल वाटलं नव्हतं, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Solapur News : सोलापुरात महाविकास आघाडीचा पराभव प्रणिती शिंदेंमुळेच, राष्ट्रवादी नेत्याचा गंभीर आरोप; कारणही सांगितलं
परंतु धनगर समाजाचे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना सोलापूर शहर मध्यची उमेदवारी देण्यात आली. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हा बालेकिल्लादेखील प्रणिती शिंदेंना वाचवाता आला नाही. त्यांनी महाविकास आघाडीत समन्वय ठेवला नसल्याने दारुण पराभव झाला, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रशांत बाबर यांनी केला आहे.