Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, २८ नोव्हेंबर २०२४ : कन्यासह ४ राशींनी जपून बोला! अचानक धावपळ होईल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य
Today Horoscope 28 november in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज २८ नोव्हेंबर गुरुवार आहे. तसेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. चित्रा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सौभाग्य योगाचा संयोग जुळून आला आहे. काही राशींना आज सावध राहावे लागणार आहे. कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी करार कराल. कौटुंबिक जीवनात एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा आहे.
आज २८ नोव्हेंबर गुरुवार आहे. तसेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. चित्रा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सौभाग्य योगाचा संयोग जुळून आला आहे. काही राशींना आज सावध राहावे लागणार आहे. कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी करार कराल. कौटुंबिक जीवनात एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नात्यात दूरावा येईल. स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर योजना यशस्वी होतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. नोकरदार लोकांना काम वेळेवर पूर्ण केल्याने वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – नात्यात दूरावा येईल
आज तुमच्या कौटुंबिक खर्चात अचानक वाढ होऊ शकते. ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी करार कराल. कौटुंबिक जीवनात एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नात्यात दूरावा येईल.
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
वृषभ – कामात अडथळे येतील
विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी मन एकाग्र करावे लागेल. तरच यश मिळेल. कामात अडथळे येतील. स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर योजना यशस्वी होतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साह राहिल. व्यवसायात नफा मिळविण्याच्या संधी मिळतील.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा
मिथुन – आरोग्याची काळजी घ्या
आज रोजगार बदलण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. नोकरदार लोकांना काम वेळेवर पूर्ण केल्याने वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाशी संबंधित समस्या त्रास देतील. व्यवसायात धोकादायक सूचना टाळाव्या लागतील. मित्रांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा
कर्क – व्यापारात नफा
आज कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. त्याचे परिणाम तुम्हाला मिळतील. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना कामात सूचनांचा उपयोग करावा लागेल. ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. भावंडांच्या मदतीने घरगुती कामे पूर्ण कराल. वडिलांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. बिझनेस डील फायनल केल्याने नफा होईल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा
सिंह – कामात अडथळे येतील
आज नवीन सौदे फायदेशीर ठरतील. व्यवसायात नवीन गोष्टी केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामात अडथळे निर्माण करु शकतात. सावधगिरीने काम करावे लागेल. भावाच्या लग्नातील अडथळे दूर होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा
कन्या – रागावर नियंत्रण ठेवा
आज तुमच्या नेतृत्वाखाली कामे होतील. तुम्हाला त्यात प्रसिद्धी मिळेल. कामात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. तुमची प्रगती होऊ शकते. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील प्रगती पाहून मन प्रसन्न राहिल. तुमचे विचार पालकांसोबत शेअर कराल. ज्यामुळे तणाव कमी होईल. शेजारच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा
तुळ – जुन्या कर्जातून मुक्त व्हाल.
आज तुमच्या व्यवसाय नवीन प्रकल्प सुरु केल्यास भविष्यात फायदा होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामात यश मिळेल. डोळ्यांशी संबंधित आजार वाढतील. राजकारणाशी संबंधित लोकांचा वेळ चांगला जाईल. जुन्या कर्जातून मुक्त व्हाल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेश चालीसाचे पठण करा
वृश्चिक – नोकरदार लोकांना बढती मिळेल
आजचा दिवस राजकारणात यश मिळवून देणारा असेल. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे यश मिळेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. नोकरीच्या ठिकाणी लाभाच्या अनेक संधी मिळतील. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सल्ला घ्या. नोकरदार लोकांना बढती मिळेल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांकडून मान्यता मिळेल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल.कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.
धनु – रखडलेली कामे पूर्ण होतील
आज जोडीदारावर विश्वास ठेवून तुमच्या व्यवसायात जोखीम पत्करली तर नुकसान होईल. नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने आनंदी असाल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.
मकर – पार्टनरशीपमध्ये नफा मिळेल
तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणामध्ये कायद्याच्या वादात अडकाल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास नफा होईल. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांच्या नात्यात गोडवा येईल. घरातील कामे हाताळण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्याल. मुलांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेऊ शकता. जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे पूजन करा.
कुंभ – आरोग्याची काळजी घ्या
आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात अचानक प्रवास करावा लागू शकतो. आवडती वस्तू हरवू शकते. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. आरोग्याची काळजी घ्या, खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील निर्णय घाईने घेऊ नका. भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागेल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचा पाठ करा
मीन – कामात यश मिळेल.
आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. संयम आणि सौम्य वर्तनामुळे काही गोष्टी दूर कराल. वडिलांच्या आशीर्वादाने काम सुरु केले तर नक्की यश मिळेल. व्यवसायात जोखीम घेतल्यास नफा मिळेल. एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर देऊ नका. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा.