Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 28 नोव्हेंबर 2024: रागावर ठेवा नियंत्रण, अन्यथा घडेल अनर्थ ! यश मिळेल, संयम ठेवा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

5

Numerology Prediction, 28 November 2024 : 28 नोव्हेंबर रोजी मूलांक 1 आणि मूलांक 3 च्या जातकांनी अपशब्द बोलू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. मूलांक 2 काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहेत.मूलांक 5 असणाऱ्यांना मेहनतीचे फळ नक्की मिळेल, संयम ठेवा. मूलांक 7 च्या लोकांसाठी दिवस उत्तम असून तुमचे काम इतरांना प्रभावीत करेल. मूलांक 8 चा अनोळखी लोकांशी संवाद वाढेल. मूलांक 9 असणाऱ्यांनी स्वतः ज्या काही योजना केल्या आहेत त्या इतरांना सांगू नका. याबद्दल अधिक जाणून घेऊया. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 28 नोव्हेंबर 2024: रागावर ठेवा नियंत्रण, अन्यथा घडेल अनर्थ ! यश मिळेल, संयम ठेवा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Numerology Prediction, 28 November 2024 : 28 नोव्हेंबर रोजी मूलांक 1 आणि मूलांक 3 च्या जातकांनी अपशब्द बोलू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. मूलांक 2 काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहेत.मूलांक 5 असणाऱ्यांना मेहनतीचे फळ नक्की मिळेल, संयम ठेवा. मूलांक 7 च्या लोकांसाठी दिवस उत्तम असून तुमचे काम इतरांना प्रभावीत करेल. मूलांक 8 चा अनोळखी लोकांशी संवाद वाढेल. मूलांक 9 असणाऱ्यांनी स्वतः ज्या काही योजना केल्या आहेत त्या इतरांना सांगू नका. याबद्दल अधिक जाणून घेऊया. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

मूलांक 1 – अपशब्द बोलू नका, रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. वादाची शक्यता आहे. लवलाइफमध्ये दबाव असेल, त्यामुळे तणाव वाढेल. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रागावलात किंवा काही अपशब्द बोललात तर नात्यात अधिक दूराव येईल. प्रॉपर्टी संबंधित कागदपत्रांची काळजी घ्या.

मूलांक 2 – काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक असून गप्पांमध्ये वेळ मस्त व्यतीत होईल. तुमच्या मनातील विचार कोणाबरोबर शेअर करायची संधी मिळेल. फॅशन आणि कला क्षेत्राशी संबंधित लोक काही तरी नवीन करण्याचा विचार करतील.

मूलांक 3 – रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण मनातील शंका अधिक वाढू न देता त्याला वेळीच थांबवा. तुमच्या हट्टीपणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती अचानक तुमच्या कामात हस्तक्षेप करुन काम थांबवेल. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा अनर्थ होईल.

मूलांक 4 – मनमानीपणावर नियंत्रण ठेवा

मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला असून प्रवासाला जाण्याचा योग आहे. तसेच मित्रांची साथ मिळेल. तुमच्या मनमानीपणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमचा जोश किंवा मस्ती दुसऱ्यांसाठी त्रासदायक होत नाही याचा विचार नक्की करा.

मूलांक 5 – मेहनतीचे फळ नक्की मिळेल, संयम ठेवा

मूलांक 5 साठी आजचा दिवस जास्त मेहनतीचा आहे. मेहनतीनंतर त्वरीत तुम्हाला परिणाम दिसणार नाहीत, पण निराश होवू नका. मेहनतीचा फळ भविष्यात मिळणार आहे. ताणतणावापासून दूर राहा. घरात वातावरण ठिक असेल.

मूलांक 6 – काम व्यवस्थित पार पडेल

मूलांक 6 साठी आजचा दिवस चांगला असून काम व्यवस्थित पार पडेल आणि तुम्हाला फायदा होईल. कुटुंबासोबत दिवस आनंदात आणि मौजमजेत व्यतीत करणार आहात. मुलांकडून काही मदत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या कामातील अडचणी दूर होतील.

मूलांक 7 – तुमचे काम इतरांना प्रभावीत करणार

मूलांक 7 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. ऑफिसमध्ये तुमचे काम सगळ्यांना प्रभावित करेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. घरात वातावरण ठिक असेल.

मूलांक 8 – अनोळखी लोकांशी संवाद वाढेल

मूलांक 8 साठी आजचा दिवस ठिक आहे. अनोळखी लोकांशी संवाद वाढेल. घरची कामे इतरांसोबत मिळून मिसळून कराल. कामात फोकस राहा म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील.

मूलांक 9 – तुमच्या योजना इतरांना सांगू नका

मूलांक 9 साठी आजचा दिवस ओके आहे पण तुमच्या कामात इतरांचा हस्तक्षेप त्रासदायक ठरू शकतो. तुमच्या योजना इतरांना सांगू नका. तुमच्या मनातील विचार इतरांसोबत शेअर करणे तुम्हाला पसंत नाही आणि तुम्ही तसेच वागाल. कोणाशी वाद होऊ शकतो पण तुम्ही शांततेने सगळी परिस्थिती हाताळा

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.