Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Surya Gochar 2024 : धनु राशीत सूर्याचे संक्रमण! तुळसह ६ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती वाढ, व्यवसाय-नोकरीत लाभ

5

Surya Gochar 2024 Dhanu Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार १५ डिसेंबरला सूर्याचे धनु राशीत संक्रमण होणार आहे. त्यानंतर खरमासाला सुरुवात होईल. धनु ही गुरुची राशी आहे. सूर्याचे धनु राशीत संक्रमण झाल्यामुळे तुळसह ६ राशींना फायदा होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Surya Gochar 2024 : धनु राशीत सूर्याचे संक्रमण! तुळसह ६ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती वाढ, व्यवसाय-नोकरीत लाभ

Sun Transit in sagittarius :
ज्योतिषशास्त्रानुसार १५ डिसेंबरला सूर्याचे धनु राशीत संक्रमण होणार आहे. त्यानंतर खरमासाला सुरुवात होईल. धनु ही गुरुची राशी आहे. सूर्याचे धनु राशीत संक्रमण झाल्यामुळे तुळसह ६ राशींना फायदा होणार आहे.
सूर्याचे संक्रमण धनु राशीत १५ डिसेंबरला रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी होईल. खरमास सुरु झाल्यामुळे लग्न, मुंडन, गृहप्रवेश इत्यादी कार्य या काळात करणे वर्ज्य मानले जाते. जाणून घेऊया सूर्य संक्रमणामुळे कोणत्या ६ राशींचे नशीब चमकणार आहे.

मेष राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव

सूर्य संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. या काळात लांबचा प्रवास करिअरसाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिकांना प्रवासामुळे फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या भाग्य तुमच्या पाठीशी असेल. पैशांची बचत कराल. जोडीदारासोबतच्या नात्यात आनंदी राहाल. व्यापारांना व्यवसायात नफा होईल. गुंतवणुकीतून फायदा होईल.

मिथुन राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव

सूर्य संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल. करिअर आणि नातेसंबंधात चांगले दिवस येतील. व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर राहिल. नोकरीमध्ये कामाचा उत्साह वाढेल. मेहनत आणि नियोजनामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशांची आवक चांगली राहिल. प्रेम जीवनात आनंद राहिल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. व्यावसायिकांना विशेष लाभ होईल.

सिंह राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव

सूर्य संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होतील. लांबच्या प्रवासातून करिअरमध्ये प्रगती होईल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहिल. नवीन योजनांमधून चांगला नफा मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ बचतीसाठी अनुकूल राहिल. करिअरमध्ये हुशारीने आणि उत्कृष्ट योजनांसह पुढे जाल. त्यात चांगले यश आणि आर्थिक लाभ मिळेल. कठोर परिश्रम आणि बुद्धीने ध्येय साध्य कराल.

तुळ राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव

तुळ राशीच्या लोकांना प्रवास, नातेसंबंध आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. हे संक्रमण करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात नफा आणि प्रेम जीवनात ताकद देईल. कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. भांवडांसोबत चांगला वेळ घालवाल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. प्रवासासोबतच शिकण्याच्या नवीन संधी मिळतील. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहिल. पार्टनरशीपमध्ये तुमचे संबंध चांगले राहातील.

वृश्चिक राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव

सूर्य संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीमध्ये यश मिळेल. मेहनतीचे फळ देखील मिळणार आहे. चांगल्या योजना आणि व्यावसायिक पार्टनरकडून नफा मिळेल. पैशांचे योग्य नियोजन केले तर कमाईसोबत बचत करु शकाल. धनु राशीत सूर्याचे संक्रमण नोकरी आणि व्यवसायात शुभ फल देईल. मेहनतीचे फळ मिळणार आहे.

धनु राशीवर सूर्य संक्रमणाचा प्रभाव

धनु राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैयक्तिक संबंध सुधारतील. अनेक क्षेत्रात सकारात्मक प्रभाव पडेल. नोकरदार लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहिल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता अधिक आहे. करिअर क्षेत्रात नशीब तुम्हाला साथ देणार आहे.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.