Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis: ‘देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. त्यांनी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.
‘बदला घेण्याचे राजकारण करतात’, असा ठपका फडणवीस यांच्यासमोर होता. तो आता पुसून निघेल. आमचे वैयक्तित वैर नाही, ही वैचारिक लढाई आहे, असेही वडेट्टीवार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. ‘काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना आता मोदी आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागणार आहे.
मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर, दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे’, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
पाचपैकी एका मुलीचा बालविवाह! देशात वर्षभरात २ लाख विवाह रोखले; प्रथा निर्मूलनासाठी नवी मोहीम
‘हटाव’ अभियानात नाही !
‘प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवण्याच्या अभियानात कुठेही नाही. अशा अभियानाची काहीच गरज नाही. काही चुका होत असतात, राज्यात मोठा पराभव झाल्याने मंथन होणे गरजेचे आहे’, अशी भूमिका व्यक्त करून विजय वडेट्टीवार यांनी पटोले यांची पाठराखण केली. मध्य नागपुरात पराभूत झालेले बंटी शेळके यांच्या आरोपांकडे लक्ष वेधले असता, ‘शेळके काय बोलले माहिती नाही. त्यांचा उद्रेक का झाला, त्यांची भाषा का बदलली, हे श्रेष्ठींच्या कानावर घालू. उद्वेगाची कारणे शोधणे गरजेचे आहे’, असे वडेट्टीवार म्हणाले.
शेळके यांना राहुल गांधी व श्रेष्ठींनी उमेदवारी दिली. प्रदेश नेतृत्व शिफारस करत असते. शेळके लढवय्या आहेत. निवडणुकीत मदत कमी पडल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. जय-पराजय होत असतो. मात्र, संयमदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. १६चे १६० कसे होतील, यावर आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी प्रदेशातील नेत्यांना दिला.
हिंगलाज देवी मंदिरात मोठी चोरी; दागिने अन् दानपेटीतील रक्कम असा ७६ हजारांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद
‘त्यांची उपयुक्तता संपली’
‘काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची २०२९पर्यंत उपयुक्तता संपलेली राहील. त्यांना मोदी, फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागेल. दिले तर ठीक, नाही तर गप्प बसावे लागेल. मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर सत्तेची सर्वोच्च खुर्ची न मिळाल्याने शिंदे यांचा चेहरा पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही; तर दुसरा चेहरा राहील. पद स्वीकारणे त्यांचा नाइलाज आहे,’ असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.