Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मासिक अंक ज्योतिष डिसेंबर 2024: या जन्मतारखेच्या लोकांना धनलाभासह ऑफिसच्या कामात प्रगती! मोठे बदल टेन्शन वाढविणार ! वाचा अंकशास्त्रानुसार डिसेंबर चे राशीभविष्य

6

Numerology Horoscope, December 2024: डिसेंबर महिन्यात मंगळ आणि शुक्र यांचा समसप्तक योग तयार होतो आहे. त्याचा लाभ सर्व मूलांकांना होणार आहे. मूलांक 1 साठी डिसेंबर महिना नोकरी, व्यवसायात प्रगती करणारा आहे. मूलांक 2 ला तर गुंतवणुकीतून उत्तम फायदा मिळेल. मूलांक 4 साठी लवलाइफमध्ये नाराजीचा सुर असेल. मूलांक 6 असणाऱ्यांची कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजेक्ट्स यशस्वी होतील. मूलांक 9 च्या जातकांनी प्रोजेक्टचा ताण कमी घ्यावा. चला तर जन्मतारखेनुसार मूलांक १ ते मूलांक ९ असलेल्या लोकांना डिसेंबर महिना कसा जाईल ते जाणून घेऊ.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मासिक अंक ज्योतिष डिसेंबर 2024: या जन्मतारखेच्या लोकांना धनलाभासह ऑफिसच्या कामात प्रगती! मोठे बदल टेन्शन वाढविणार ! वाचा अंकशास्त्रानुसार डिसेंबर चे राशीभविष्य

December 2024 Monthly Ank Rashifal : डिसेंबर महिन्यात मूलांक 1 मूलांक 2 सह या मुलांकांची डिसेंबर महिन्यात प्रगती होईल. या मूलांकाचे जातक नवीन प्रोजेक्टवर काम करतील. मूलांक 5 सह या मूलांकांची कामे मार्गी लागतील. चला तर जाणून घेऊया, जन्मतारीखानुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा राहील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): नोकरी, व्यवसायात प्रगती

डिसेंबर महिन्यात तुमच्यासाठी नोकरी आणि व्यवसायाच्या कामात प्रगती होईल. आणि क्रिएटीव्ह कामात तुम्हला उत्तम यश मिळणार आहे. आर्थिक स्थितीत वाढ असून गुंतवणुकीमुळे चांगला लाभ होईल. लवलाइफमध्ये तणाव आहे. कुटुंबात देखील थोडा तणाव असल्यामुळे झोपेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी मात्री सुख समृद्धीचे योग आहेत.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): गुंतवणुकीतून फायदा, निर्णयावर ठाम राहा

डिसेंबर महिन्यात आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा असून गुंतवणुकीमुळे फायदा होईल. ऑफिसच्या कामात तुमच्या निर्णयावर ठाम राहा तुम्हाला उत्तम यश मिळेल. लवलाइफमध्ये नाराजीचे सुर आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुम्हाला जलद गतीने निर्णय घ्यायला हवेत.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होणार

डिसेंबर महिन्यात तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल तसेच या महिन्यापासून तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहात. लवलाइफमध्ये संवादाने परिस्थितीत सुधारणा होईल. तब्येतीची काळजी घ्या. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाणार आहे.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): लवलाइफमध्ये नाराजीचा सुर

डिसेंबर महिन्यात काही गुंतवणुक फायदा देणार तर काही गुंतवणूक तुमचा तोटा करणार आहे. लवलाइफमध्ये नाराजीचा सुर असेल त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुमचे लक्ष इतर गोष्टींमध्ये लागणार नाही. कामात समतोल राखून पुढे जा, यश मिळेल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरतील.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): कामे मार्गी लागतील, धनलाभाचा योग

डिसेंबर महिन्यात नवीन प्रोजेक्टवर काम सुरु होणार आणि तज्ज्ञाची मदत तुम्हाला मिळणार. भागीदारीत केलेली कामे उत्तम धनलाभ होणार आहे. कामात उत्तम यश आहे पण अफवांवर विश्वास ठेवू नका. लवलाइफमध्ये दुराव्याची शक्यता आहे. समंजसपणे निर्णय घ्या म्हणजे सगळे काही ठिक होईल. खर्च जास्त होणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा अन्यथा त्रास वाढेल.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): कार्यक्षेत्रात प्रगती, प्रोजेक्ट्स यशस्वी होणार

डिसेंबर महिन्यात या महिन्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमधून फायदे मिळवाल आणि आर्थिक लाभ होईल. काहीतरी नवीन शिकून तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल. कार्यक्षेत्रात प्रगती असून प्रोजेक्ट्स यशस्वी होतील, पण तरीही एका प्रोजेक्टमुळे तुम्ही काळजीत असाल. लवलाइफमधील समस्या संवाद साधून सोडवू शकता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती ठिक असेल.

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): प्रोजेक्टमध्ये सकारात्मक बदल

डिसेंबर महिन्यात ऑफिसच्या कामात प्रगती असून चांगल्या भविष्यासाठी सकारात्मक विचारांसह काही योजना तयार करणार आहात. आर्थिक दृष्टिकोनातून लाभ होईल आणि कुटुंबाच्या मदतीने आर्थिक स्थिती सुधारेल. लवलाइफ उत्तम असून नातेसंबंध अधिक दृढ होतील तसेच मन प्रसन्न राहील. डिसेंबरच्या शेवट्या आठवड्याच मानसिक समाधानाची अनुभूती होईल.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): आर्थिक बाबतीत दबाव येण्याची शक्यता

डिसेंबर महिन्यात लवलाइफ उत्तम आहे. सुख-समृद्धीचे योग आहेत. आर्थिक परिस्थिती मात्र फारशी ठिक नाही, इतर लोक तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. ऑफिसमध्ये चांगली बातमी समजेल, पण काही अडचणी येऊ शकतात. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच स्वतःवर संयम ठेवा तुम्हाला कामात चांगले परिणाम मिळतील.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): तुमच्या विचारांवर ठाम राहा, ताण कमी करा

डिसेंबर महिना तुमच्यासाठी उत्तम असून जीवनात आनंदाची भर पडेल. तुम्ही जे काम करत आहात तिथे तुमच्या विचारांवर ठाम राहून आणि विश्वास ठेवून निर्णय घेतले, तर चांगले परिणाम दिसतील. जर एखाद्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही जास्त ताण घेतला तर त्याचा त्रास होईल. या महिन्याच्या शेवटी, तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवात होईल, जी तुम्हाला शांती, समाधान आणि सुख देईल, तेव्हा तयार राहा.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.